सोलापूर- पुलवामामध्ये दहशतवाद्यांसोबत लढताना वीरमरण आलेल्या सोलापुरातील सुनील ऊर्फ किशोर काळे अनंतात विलीन झाले आहेत. लष्करी इतमामात त्यांच्यावर बार्शी तालुक्यातील पानगाव या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे मोठे बंधू नंदकिशोर काळे आणि मुलाने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. पाणावलेल्या डोळ्यांनी आणि जड अंत:करणाने सुनील काळे यांना शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला.
हुतात्मा सुनील काळेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - martyr sunil kale latest news
पुलवामामध्ये दहशतवाद्यांसोबत लढताना वीरमरण आलेल्या सोलापुरातील सुनील ऊर्फ किशोर काळे अनंतात विलीन झाले आहेत.
![हुतात्मा सुनील काळेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार martyr sunil kale](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7750001-444-7750001-1592990593200.jpg)
हुतात्मा सुनील काळेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
हुतात्मा सुनील काळेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
सीआरपीएफ, तसेच ग्रामीण पोलिसांनी वीर जवान सुनील काळे यांना मानवंदना दिली. सुनील काळे यांना निरोप देण्यासाठी आरपीएफचे महानिरीक्षक संजय लाटकर, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.