सोलापूर:कविता कल्याणम असे मयत विवाहित महिलेचे नाव आहे. या विवाहितेने प्रियकराच्या जाचाला कंटाळून 6 मार्चच्या पहाटे राहत्या घरी आत्महत्या केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात 6 मार्च रोजी रात्री उशीरा प्रियकर संजय राठोड (रा.विजय ब्रम्हनाथ नगर,मुळेगाव रोड, सोलापूर) या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने नागरिक हळहळ व्यक्त करत आहे.
प्रेमसंबंध तोडायला तयार नव्हता: विवाहित महिला कविता कल्याणम व संदीप राठोड या दोघांमधलं प्रेमप्रकरण संपुष्टात आले होते. मात्र त्यानंतरही प्रियकर संदीप राठोड हा विवाहित प्रेयसीला सोडत नव्हता. त्यामुळे प्रेयसीने कंटाळून टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. 5 मार्च रोजी रात्री संदीप राठोड हा, कविताच्या जुना विडी घरकुल येथील घरी मध्यरात्री आला होता. कविताने बराचवेळ दारच उघडले नव्हते. शेवटी कविताने दार उघडताच, संदीप घरात आला आणि कविताला बेदम मारहाण करू लागला. मला सोडू नकोस असे सांगून तो रात्रीच निघून गेला. 6 मार्चच्या पहाटे कविताने स्वतःच्या राहत्या घरी आत्महत्या करत जीवनयात्राच संपवली. याबाबत विवाहित महिलेच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
त्यावेळी प्रेमसंबंध जुळले: कविता हिचा पती कोरोना महामारी सुरू होण्याअगोदर रोजगाराच्या शोधात तामिळनाडू येथे गेला होता.त्यावेळी कविता हिला सासरी सोडले होते.शेजारी राहणाऱ्या संदिप राठोड सोबत कविताचे प्रेमसंबंध जुळले होते. गेल्या दोन वर्षांपासून कविता कल्याणम हिचे संदीप राठोड प्रेमप्रकरण सुरू होते. मात्र सदरची बाब कविता कल्याणम हिच्या पतीला कळल्यानंतर पतीने आपल्या पत्नीला समज देत माफ केले होते. अशी घटना पुन्हा होऊ नये अशी ताकीद दिली होती. कविताच्या आईने देखील समज दिली होती. त्यानंतर दोघातील प्रेम प्रकरण संपुष्टात आले होते. कविता पतीसोबत विवाहित आयुष्य जगण्यासाठी, सासरकडील घर सोडून जुना विडी घरकुल परिसरात भाड्याने राहावयास आली होती. मात्र प्रियकर संदीप राठोड हा मयत कविता कल्याणम यासोबतच असलेले प्रेमसंबंध तोडण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी कविताने जीवनयात्राच संपवत प्रेमप्रकरण संपवले आहे. कविताला 11 वर्षाचा मुलगा देखील आहे.
प्रियकरविरोधात गुन्हा दाखल: संदीप राठोड वारंवार कविता कल्याणमला त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून कविता कल्याणम हिने टोकाचे पाऊल उचले. अशी माहिती कविता कल्याणम यांच्या नातेवाईकांनी व शेजाऱ्यांनी पोलीसांना दिली होती. एमआयडीसी पोलीसानी खोलात जाऊन तपास करत संदीप राठोडवर गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा:Solapur Crime धक्कादायक एकाच कुटुंबातील तीन महिलांची दगडाने ठेचून हत्या