पंढरपूर -तालुक्यातील जैनवाडी येथे २१ वर्षीय विवाहितने मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. पूजा महेश लिगडे (रा. जैनवाड़ी पंढरपूर), असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. सासरच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आले आहे
याप्रकरणी मृत विवाहितेचा भाऊ चैतन्य (कासेगाव) याने दिलेल्या तक्रारीवरुन मंगळवारी सासरच्या चार जणांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विवाहितेला दोन मुले आहेत.
पूजाचातीन वर्षांपूर्वी विवाह महेशसोबत झाला. त्यानंतर दोन वर्ष सासरच्या मंडळींनी चांगले वागवले. सासरची मंडळींनी पूजा तुला स्वयंपाक नीट येत नाही, माझ्या मुलाचे तुच्यासोबत लग्न करून आम्हाला मनःस्ताप झाला आहे, असा तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होते, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या त्रासाला कंटाळून पूजा काही दिवस माहेरी राहण्यासाठी गेली होती. एक आठवड्यपूर्वी पती महेशने फोन करून तुम्ही तुमची मुलगी नांदायला पाठवून द्या, नाही तर तिला कधीच नांदवनार नाही, अशी धमकी दिली होती. त्याच दिवशी भाऊ चैतन्य, वडील, मामा दत्तात्रेय मोरे यांनी पूजा हिला तिच्या सासरी जैनवाड़ी येथे आणून सोडले. मात्र, त्याच रात्री पूजाचे सासरच्या मंडळीशी जोरदार भांडण झाले. पूजाने माहेरी फोन केल्यानंतर उद्या सकाळी बघू म्हणून सांगितले. मात्र, दुसऱ्या दिवशी 12 वाजता पूजाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती सासरच्या मंडळी दिली.
याबाबती पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भस्में हे करीत आहेत.