माढा (सोलापूर)- माढ्यातील शुक्रवार पेठ मोमीन गल्लीतील सागर चवरे या तरुणाने घराच्या समोरील झाडाखाली सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत साध्या पद्धतीने रविवारी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह केला.
कोरोना : माढ्यात झाडाखाली साध्या पद्धतीनं उरकलं लग्न - simple Marriage due to corona lock down
सध्या कोरोना विषाणूच्या धास्तीमुळे सर्वत्र लाॅकडाऊन लागू आहे, एकत्र जमण्यावर बंदी आहे. अशातच अनेकांचे विवाह समारंभ रखडले आहेत, तर काहींनी पुढे ढकलले आहेत.
सागर आणि वधू सोनल हे विवाह बंधनात अडकले आहेत. विवाहादरम्यान सुरक्षित अंतर राखत आणि वधू-वरांसह नातेवाईकांनी मास्क लावून खबरदारी बाळगल्याचे दिसून आले. सध्या कोरोना विषाणूच्या धास्तीमुळे सर्वत्र लाॅकडाऊन लागू आहे, एकत्र जमण्यावर बंदी आहे. अशातच अनेकांचे विवाह समारंभ रखडले आहेत, तर काहींनी पुढे ढकलले आहेत. परंतु, या परिस्थितीतही तडजोड करत सरकारच्या आदेशाचे व निर्देशांचे पालन करत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला.
माढ्यातील शंकर चवरे यांचा मुलगा सागर याचा माढ्यातीलच संजय जगदाळे यांची मुलगी सोनल हिच्याशी विवाह ठरला होता. मात्र, कोरोना संसर्गामुळे विवाह रखडला होता. दोन्ही कुटुंबीयांच्या विचारांती वर सागर चवरे याने आपल्या घराच्या समोरील झाडाखाली साध्या पद्धतीने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह केला.