पंढरपूर -जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान 15 जानेवारी रोजी होणार आहे. या दिवशी मतदान केंद्राच्या परिसरात सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी आठवडी बाजार भरविण्यास बंदी असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दिले आहे.
या ठिकाणी आठवडीबाजार राहणार बंद -

मतदानाच्या दिवशी बार्शी तालुक्यातील कासारी व कारी, अक्कलकोट तालुक्यातील कुरनुर, मैदर्गी व करजगी, पंढरपूर तालुक्यातील तारापूर, चळे, बाभूळगांव, पिराची कुरोली, शेळवे, मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर, सांगोला तालुक्यातील जवळा, खवासपूर, कोळे, मेथवडे, नाझरे व शिरभावी, माळशिरस तालुक्यातील गिरवी, तांदूळवाडी, उंबरे (वेळापूर), बोरगांव, माढा तालुक्यातील मानेगाव, खैराव, माहोळ तालुक्यातील अर्जुनसोंड, हिंगणी(नि.), अंकोली आणि टाकळी (सि.) या ठिकाणचे आठवडी बाजार बंद राहतील.
हेही वाचा - उसाच्या ट्रॅक्टरला कारची धडक; पती-पत्नी जागीच ठार