सोलापूर-मराठा समाजाच्या आरक्षणावर सुरू झालेले आंदोलन ( Maratha Reservation Movement ) अजूनही जिवंत आहे. त्याचा कधीही उद्रेक होऊ शकतो, असा इशारा माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी दिला. सोलापूर दौऱ्यावर असताना महाविकास आघाडी सरकारला त्यांनी एकप्रकारे इशाराच दिला ( Narendra Patil On Maratha Reservation Movement ) आहे. कै. अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त नरेंद्र पाटील सोलापुरात आले होते. सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चामधील मराठा बांधवानी 40 व्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच कै अण्णासाहेब पाटील यांची रांगोळी माध्यमातून प्रतिमा साकारली होती. दौऱ्यावर असताना नरेंद्र पाटील यांनी सोलापूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपले मत व्यक्त केले आणि महाविकास आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त ( Maratha Reservation State Govt In SC ) केली. यावेळी राम जाधव, किरण पवार आदी उपस्थित होते.
आपल्यात आणि संभाजी राजे यांमध्ये कोणताही इगो नाही :नरेंद्र पाटील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, आपल्यात आणि संभाजीराजे यांच्यात कोणताही इगो नाही. मी त्यांच्या मुंबईत मधील आंदोलनातही सहभागी झालो होतो. संभाजीराजे मोठे आहेत. त्यांनी सर्वांना घेऊन आंदोलन कराव. "सोलापुरात मराठा क्रांती मोर्च्याच्या पुढाकाराने मोठे आंदोलन हाती घेतले होते. यावेळी संभाजीराजे यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या विरोधात काम केले. तसेच हे भाजप पूरस्कृत आंदोलन आहे असा देखील अपप्रचार केला. तरीही मराठा आंदोलन यशस्वी करून दाखवले. आमची किंवा संभाजीराजे यांची एकच भूमिका आहे, मराठा समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत.