पंढरपूर (सोलापूर) -पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पोटनिवडणुकीसाठी पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील इच्छुक उमेदवार आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. इच्छुकांकडून विविध पक्षांकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीकडून तिकीटासाठी इच्छुकांची गर्दी मोठी आहे तर भाजप भाजपचा गोठ्यातून कोणाला उमेदवारी मिळते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. यामुळे मतदारसंघांमध्ये राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादीकडून इच्छुकांची गर्दी, भगीरथ भालके यांचे नाव आघाडीवर
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघ रिक्त झाला आहे. त्यातच आमदार भारत भालके यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची या मतदारसंघातून भक्कम पकड होती. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, महा विकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीकडे हा मतदार संघ आहे. तसेच राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे सुपुत्र व विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके व भारत भालके यांची पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी देण्याची मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी अनेक दिग्गजांनी बारामतीच्या वाऱ्या केल्या आहेत. मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत जोरदार चर्चा रंगली होती. यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार याबाबत शंका आहे.
पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या गटातून उमेदवारीबाबत उत्सुकता
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीमध्ये भाजप आपला उमेदवार रिंगणात उतरणार आहे. त्यासाठी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी होताना दिसत आहे. यामध्ये सध्या परिचारक कुटुंबातील उमेश परिचारक व प्रणव परिचारक यांचे नाव आघाडीवर आहे. हे तर प्रणव परिचारक यांनी निवडणूक लढण्याची इच्छा आहे व्यक्त केली आहे. तसेच मंगळवेढा येथील दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांच्या नावाचाही विचार भाजपकडून केला जात आहे. तसेच शिवसेनेचे नेत्या शैलेजा गोडसे याही भाजपकडून मिळणार असल्याची चर्चा आहे. तसेच धनगर समाजाकडूनही भाजपच्या उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे. मात्र, आमदार प्रशांत परिचारक यांची भूमिका भाजपाच्या उमेदवारीसाठी महत्त्वाचे राहणार आहे.
रासप व स्वाभिमानीची महाविकास किंवा भाजपकडून उमेदवारी देण्याची मागणी