महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनमध्येही सोलापुरकरांना चाखायला मिळणार हापूस, दरात घसरण - आंब्याचे दर कोरोनामुळे घसरले

देवगड आणि रत्नागिरी हापूस हे दोन्ही हापूस सोलापूरात एक महिन्यापूर्वीच विक्रीसाठी दाखल झाले आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात दोन हजार ते बावीसशे रूपये प्रति पेटी हापूसची विक्री झाली. मात्र, नंतर कोरोनामुळे संपूर्ण देशात संचारबंदी लागू झाल्यामुळे हापूसचे दर कोसळले आहेत.

लॉकडाऊनमध्येही सोलापुरकरांना चाखायला मिळणार हापूस
लॉकडाऊनमध्येही सोलापुरकरांना चाखायला मिळणार हापूस

By

Published : Apr 5, 2020, 12:36 PM IST

सोलापूर- कोरोनामुळे करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळातही सोलापूरात या वर्षातील हापूस अंबा विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. कोरोनामुळे हापूसचे दर कोसळले आहेत. संचारबंदीच्या काळात कोणीही घराबाहेर पडू नये, असे आदेश असल्यामुळे हापूस अंब्याची विक्री कमी झाली असून दरही कमी झाले आहेत.

देवगड आणि रत्नागिरी हापूस हे दोन्ही हापूस सोलापूरात एक महिन्यापूर्वीच विक्रीसाठी दाखल झाले आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात दोन हजार ते बावीसशे रूपये प्रति पेटी हापूसची विक्री झाली. मात्र, नंतर कोरोनामुळे संपूर्ण देशात संचारबंदी लागू झाल्यामुळे हापूसचे दर कोसळले आहेत.

लॉकडाऊनमध्येही सोलापुरकरांना चाखायला मिळणार हापूस

सोलापूरात देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस हा 800 ते एक हजार रूपये प्रतिपेटी मिळत आहे. अत्यावश्यक सेवांची दूकाने सुरू ठेवण्यात आल्यामुळे सोलापूरातील भकालो हे भाजीपाल्याचे सूपर मार्केट उघडे असून या ठिकाणी हापूस विक्रीसाठी ठेवण्यात आलेला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details