पंढरपूर- कर्नाटक राज्यातून मंगळवेढा हद्दीत येणारा गुटख्याचा टेंम्पो पोलिसांनी पकडून टेंपोसह 7 लाख 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी सुनिल भारत वायभसे (वय 30 रा. दापोली), निलेशकुमार बन्सीलाल बाहोती (वय 30 रा. नागरगाव ता. शिरूर, पुणे) या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
22 रोजी रात्री 8.30 च्या दरम्यान कर्नाटक राज्यातून गुटखा भरून त्याची अवैधरित्या वाहतूक करत होते. याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सोडडी गावच्या शिवारात सापळा लावला आणि कारवाई केली. या प्रकरणी पोलीस शिपाई अभिजीत साळुंखे यांनी तक्रार दिली आहे.
कर्नाटक राज्यातून (एमएच-42, एक्यू 5569) या टेंम्पोमधून 13 हजार 552 रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू गुटखा, 49 हजार 920 रुपये किमतीचा विमल पान मसाला, 13 हजार 728 रुपये किमतीची सुगंधी तंबाखू, 57 हजार 600 रुपये किमतीचा आरएमडी पान मसाला, 24 हजार रुपये किमतीची एम सुगंधी तंबाखू, 1 लाख 21 हजार 968 रुपये किमतीचा विमल पान मसाला मोठा असा एकूण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. असा एकूण टेंम्पोसह 7 लाख 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सीमेवर चेकपोस्टची गरज-
मंगळवेढयापासून केवळ 20 कि.मी.अंतरावर कर्नाटकची सीमा आहे. कर्नाटक राज्यात गुटखा खुला असल्याने येथील व्यापारी तेथे जावून खरेदी करून चोरटया मार्गाने मंगळवेढयात प्रवेश करीत आहेत. ही सर्व तस्करी रोखण्यासाठी मंगळवेढा सीमेवर चेक आऊटपोस्ट गरजेचे आहे.नूतन पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी या कामी लक्ष घालून सीमेवर चोख बंदोबस्त नेमावा, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.