सोलापूर- कुमठे येथील एका पन्नास वर्षीय महिलेचा खून झाला आहे. चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला आहे. शमशाद महिबूब शेख (वय 50 वर्षे, रा. कुमठे, ता. उत्तर सोलापूर), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.संशयित आरोपी पती महिबूब हबीब शेख (वय 55 वर्षे, रा. कुमठे, उत्तर सोलापूर) या विरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.पत्नीची मानच तोडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.
मानेवर आणि कानावर जबर घाव
महिबूब शेख हा गेल्या तीन महिन्यांपासून पत्नी शमशादच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यामुळे दोघा पती-पत्नीमध्ये भांडणे होत होती. पण, रविवारी (दि. 29 नोव्हेंबर) सकाळी संशयावरून दोघांमध्ये वाद विकोपास गेला. घरातील कुऱ्हाड घेऊन महिबूबने शमशादच्या मानेवर, नाकावर व कानावर जोराने घाव घातला. या दोन घावातच शमशाद याची मान मोडली.
मुलाने दिली तक्रार
मागील तीन महिन्यांपासून आरोपी महिबूब हबीब शेख हा घरात दोन्ही मुलांवर चिडून होता. पत्नीवर संशय घेत कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत सतत वाद घालता होता. शेवटी रविवारी सकाळी खून करूनच महिबूब शेख हा शांत झाला. मुलगा जीलानी यानेच वडिलांविरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.