सोलापूर -येथेभर दुपारी 2 वाजता पाण्यासाठी व्याकूळ झालेला एक मनोरुग्ण सोलापुरातील एका रस्त्यावर तासभर तडफडत होता. मात्र, तडफडत असलेल्या या मनोरुग्णाच्या मदतीला कोणीच धावून न आल्याने पाण्यासाठी विव्हळत त्याचा मृत्यू झाला.
पाण्याअभावी 'त्याचा' रस्त्यावरच तडफडून मृत्यू, कोरोनाच्या भीतीने कोणी जवळही गेले नाही
सोमवारी दुपारी दोन वाजता शहरातील जूनी पोलीस लाईन ते दमानी नगरच्या रस्त्यावर पाणी-पाणी म्हणत एक मनोरुग्ण तडफडत होता. कोरोनाच्या भीतीमुळे कोणीच त्याच्याजवळ जायला तयार नव्हते. रुग्णवाहिकेला फोन करण्यात आला. मात्र, रुग्णवाहिका तब्बल एक तासानंतर आली तोपर्यंत त्या मनोरुग्णाचा तडफडून मृत्यू झाला होता.
सोमवारी दुपारी दोन वाजता शहरातील जूनी पोलीस लाईन ते दमानी नगरच्या रस्त्यावर पाणी-पाणी म्हणत एक मनोरुग्ण तडफडत होता. कोरोनाच्या भीतीमुळे कोणीच त्याच्याजवळ जायला तयार नव्हते. तो रस्त्यावर तसाच विव्हळत पडला होता. दरम्यान त्या भागातील तरुण सामाजिक कार्यकर्ता किरण पवार याने या संदर्भात 108 नंबरवरुन रुग्णवाहिका बोलाविण्यासाठी फोन केला. मात्र, फोन उचलला गेला नाही. काही वेळानंतर संबंधित पोलीस ठाण्याला सूचना देण्यात आली. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाला कळविण्यात आले. त्यानंतर पोलीस कंट्रोल रुमला फोन गेला. या सर्व प्रकारात जवळपास एक तास निघून गेला.
तब्बल एक तासानंतर तासानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाची रुग्णवाहिका आली. त्यांनी रस्त्यावर पडलेल्या रुग्णाला पाहिले मात्र, त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तत्काळ पोलीस ठाण्याला कळवा असे सांगून आरोग्य विभागाची रुग्णवाहिका निघून गेली. तर, एक तासाचा वेळ गेल्यामुळे रस्त्यावर तळमळत पडेल्या त्या मनोरुग्णाने तेथेच आपले प्राण सोडले होते. त्यानंतर काही वेळाने पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला आणि बेवासरांसाठी काम करणाऱ्या लादेन यांनी या मनोरुग्णाचा मृतदेह शववाहिकेतून सिव्हील रुग्णालयात नेला.