महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूरमधील माळशिरस पंढरपूर, करमाळा ठरतोय कोरोना हॉटस्पॉट

सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांचा मृत्यूचा दरही इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून येत आहे. माळशिरस तालुक्यामध्ये सुमारे 556 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.

सोलापूर जिल्हा ठरतोय हॉटस्पॉट
सोलापूर जिल्हा ठरतोय हॉटस्पॉट

By

Published : May 8, 2021, 7:42 AM IST

पंढरपूर - सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांचा मृत्यूचा दरही इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून येत आहे. माळशिरस तालुक्यामध्ये सुमारे 556 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर पंढरपुरात 353 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहे. सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये सुमारे 15 हजार 541 रुग्ण हे उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना परिस्थितीच्या आधारे 90 टक्के ग्रामीण भागात आढळतात. त्यामुळे पंढरपूर माळशिरस करमाळा माढा हे ग्रामीण भाग हॉटस्पॉट ठरत आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर कोरोनाचा विळखा..

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोनाची परिस्थिती भयावह झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुमारे 90 टक्के कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या घरापर्यंत कोरोना जाऊन पोचला आहे. नागरी भागापेक्षा जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण हे रोज जास्त आढळत आहेत. यामध्ये पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, माढा, करमाळा, बार्शी, सांगोला तालुक्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. सर्वात जास्त माळशिरस तालुक्यात 556 कोरोना रुग्णांचा अहवाल आज पॉझिटिव आला आहे. सध्या माळशिरस तालुक्यात सव्वातीन हजार कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. त्या खालोखाल पंढरपूर तालुक्यात 353 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. 2600 कोरोना बाधितांवर पंढरपूर तालुक्यात उपचार चालू आहेत.

ग्रामीण भागात ठोस उपाययोजनांची गरज..
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय सुविधा अपुऱ्या प्रमाणात आहेत. ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्ण हा उपचारासाठी नागरी भागाकडे येत असतात. मात्र नागरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना जास्त आहे. त्यामुळे शहरी भागातील वैद्यकीय सुविधांवर पडणारा ताण ही मोठा आहे. जिल्हा प्रशासनाकडून शहरी भागातही 70 टक्के कोविड हॉस्पिटलांना परवानगी दिली आहे. ग्रामीण भागातील कोविड हॉस्पिटलसाठी परवानगी देणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्ण हा नागरी भागात उपचारासाठी दाखल होत असतो. यातूनच कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोकाही आहे. जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या ग्रामपंचायतींना कोविड केअर सेंटर उभारण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ठोस उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे.

ग्रामीण भागात मृत्युदराचे प्रमाण जास्त..
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोना बाधित झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांवर वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे मृत्युदर वाढला आहे. दुसऱ्याला लाटेतील कोरोना हा ग्रामीण भागात डोकेदुखीचा विषय ठरत आहे. मृत्यू दराच्या तुलनेत सुमारे 80 टक्के मृत्यू दर हा ग्रामीण भागातील रुग्णांचा असल्याचे आढळून आले आहे. आज झालेल्या अहवालानुसार 42 कोरोना रुग्णांचा मृत्यूपैकी सुमारे 35 कोरोना बाधित रुग्ण हे ग्रामीण भागातल्या आहेत. ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीही गंभीर स्वरूपाची दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details