महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भीषण आग, लाखोंचे नुकसान - कापड दुकानाला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान

पंढरपुरातील भोसले चौकातल्या कापड दुकांनाना आग, शेजारच्या गॅरेजमधील सात दुचाकीही जळाल्या

fire
संग्रहित छायाचित्र

By

Published : Feb 11, 2021, 2:21 PM IST

पंढरपूर- शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भोसले चौक मार्केट कमिटी जागेवर असलेल्या कापडी चिंध्याच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत शेजारी असलेल्या गॅरेजलाही आग लागल्याने दुरुस्ती केलेल्या पाच ते सात गाड्या जळून खाक झाल्या आहेत. आगीची ही घटना गुरुवारी पहाटे तीन सुमारास घडली असल्याचा अंदाज आहे.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट-


शहरात मध्यवर्ती भागात भोसले चौकांमध्ये व्यापारी कमिटीच्या जागेचा गोडाऊनला पहाटेच्या सुमारास आग लागली. सुरुवातीला जुन्या कपड्यांच्या दुकानांमध्ये ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. आगीची तीव्रता प्रचंड प्रमाणात होती. धुराचे लोट शहराबाहेरूनही दिसून येत होते. या आगीत गॅरेजमध्ये पाच ते सहा गाड्या जळून खाक झाल्या आहेत.

दोन अग्निशामक गाड्याकडून आग आटोक्यात

या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर सुमारे दीड तासानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश मिळाले. त्यानंतर जेसीबीच्या साह्याने दुकानातील सर्व साहित्य बाहेर काढण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details