सोलापूर - शिवसेनेचे बंडखोर जिल्हा प्रमुख महेश कोठे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत भव्य दिव्य अशी प्रचार रॅली काढली आहे. अपक्ष असलेल्या महेश कोठे यांच्या या प्रचार रॅलीमध्ये शिवसेना नगरसेवक देखील सहभागी झाले होते.
शिवसेनेने महेश कोठे यांना उमेदवारी नाकारून ऐनवेळी पक्षात आलेल्या दिलीप माने यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेल्या कोठे यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून बंडखोरी केली. कोठे यांनी शिवसेना उमेदवाराच्या विरोधात भव्य दिव्य अशी रॅली काढली आहे. विशेष बाब म्हणजे अपक्ष असलेल्या कोठे यांच्या प्रचार रॅलीमध्ये सगळीकडे भगवे झेंडे पाहायला मिळत होते. तसेच महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक हेदेखील कोठे यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते.