महाराष्ट्र

maharashtra

Maharashtra Political Crisis: ईडीच्या भीतीपोटी काँग्रेसचे अनेक नेते लवकरच भाजपमध्ये जातील- सुजात आंबेडकर

By

Published : Jul 3, 2023, 10:19 AM IST

सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे रविवारी सायंकाळी सुजात आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. राष्ट्रवादीमध्ये ज्या पद्धतीने अजित पवार यांनी मला प्रदेशाध्यक्ष करा नाहीतर निर्णय घेईल, असे सांगितले होते. अखेर अजित पवारांनी तसा निर्णय घेतला. अजित पवारांनी केवळ निर्णय घेतला नाही, तर संपूर्ण पक्षच भाजपच्या बाजूने उभा केला आहे.

Sujat Ambedkar
सुजात आंबेडकर

-सुजात आंबेडकर

सोलापूर :वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांच्या दुपारच्या शपथविधीवर टीका केली आहे. 2019 च्या निवडणुकीत जनतेने राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला मतदान केले आहे, आता तेच नेते भाजपसोबत जात आहेत. भाजपच्या मांडीवर जाऊन बसत आहेत. मोदी विरोधात किंवा भाजप विरोधात मतदान केलेल्या मतदानाचा काय अर्थ राहिला, अशी टीका सुजात आंबेडकर यांनी राष्ट्रवादीवर टीका केली. महाराष्ट्र राज्यात एकच विश्वासाचा पक्ष राहिला आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी असे सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी हा संपूर्ण पक्ष भाजपच्या बाजूने आहे, असे ते म्हणाले.

संविधानाची मूल्य तुडवणारे पक्ष आपल्याला सरकारमध्ये आणायचे आहे, की 2024 मध्ये यांना चले जावचा नारा द्यायचा आहे हे जनता ठरवेल- सुजात आंबेडकर

काँग्रेसमधील अनेक नेते भाजपच्या वाटेवर :राष्ट्रवादीच्या अजित पवारांप्रमाणे काँग्रेसमध्ये देखील प्रदेशाध्यक्षपदाची मागणी करणारे अनेक नेते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. तेही आज ना उद्या उघडपणे समोर येऊन भाजपच्या बाजूने उभे राहतील. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना ईडीच्या नोटीस आलेल्या आहेत अशोक चव्हाण सहित अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. ईडीच्या भीतीपोटी काँग्रेसचे अनेक नेते लवकरच भाजपमध्ये जातील, असे वंचितचे प्रदेश प्रवक्ते फारूक अहमद यांनी माहिती दिली.


काँग्रेसच्या नेत्यांचा प्रयत्न :भाजपसोबत उघडपणे जाऊन राजकारण करायचे आहे की लपून करायचे आहे, हाही काँग्रेसच्या नेत्यांचा प्रयत्न सुरू असल्याचा आपल्याला दिसून येत आहे. पण आता महाराष्ट्राच्या जनतेने सावध व्हायला हवे, असे सुजात आंबेडकर यांनी माहिती दिली. सोळा आमदारांचे निलंबन झाल्यानंतर सरकार अल्पमतामध्ये येईल, याची पूर्वकल्पना येताच हा खेळलेला डाव असण्याची शक्यता आहे असे फारूक अहमद यांनी पत्रकार परिषदेत अंदाज व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीचे नेते व प्रदेशाध्यक्ष फारूक अहमद यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नाव न घेता या पक्षाच्या नेत्यांमध्ये नैतिक आणि चरित्र राहिलेले नाही अशी टीका केली.

हेही वाचा :

  1. Sujat Ambedkar: सुजात आंबेडकर अन् जितेंद्र आव्हाडांची गळाभेट; राजकीय चर्चा रंगल्या
  2. Assault Karni sena chief: करणी सेनेच्या प्रमुखाला भीम शक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून चोप, जितेंद्र आव्हाडांनी केले भीमसैनिकांचे अभिनंदन
  3. BJP Polkhol Campaign : भाजपच्या 'पोलखोल' अभियानाचा शिवसेनेला बसणार का फटका? वाचा सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details