महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्रकेसरी बाला रफीक शेखने केले पाणी फाऊंडेशनच्या कामावर श्रमदान - draught

निवडणुकीमुळे प्रशासकीय यंत्रणा या उपक्रमांत सहभाग झाली नव्हती. तसेच निवडणुकीमुळे काही गावांत कमी प्रतिसाद मिळाला. पण आता निवडणुकीनंतर सर्वांनी आपापले गाव पाणीदार करण्यासाठी लक्ष दिले आहे.

महाराष्ट्रकेसरी बाला रफीक शेख

By

Published : May 2, 2019, 1:47 PM IST

सोलापूर- महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेख याने त्याच्या खडकी या गावात श्रमदान केले आहे. महाराष्ट्रदिनी पाणी फाऊंडेशनच्या वतीने करमाळा तालूक्यातील खडकी या गावात काम सुरू झाले आहे. या कामावर बाला रफीक शेख याने सहभाग घेत श्रमदान केले.

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील खडकी येथे १ मे रोजी महाश्रमदान दिन साजरा करण्यात आला. यासाठी तरुण, अधिकारी व ग्रामस्थ, राजकीय पदाधिकारी आणि जलमित्र यांनी खडकी येथे श्रमदान केले. तर खडकी येथे ग्रामस्थांच्या वतीने चुलबंद श्रमदान करण्यात आले. महाराष्ट्र केसरी बालरफीक शेख याचे हे गाव असून त्यानेही यावेळी श्रमदानात सहभाग घेतला.

महाराष्ट्रकेसरी बाला रफीक शेखने केले पाणी फाऊंडेशनसाठीच्या कामावर श्रमदान

पाणी फाउंडेशनच्या गतवर्षी स्पर्धेत करमाळा तालुक्यातील २८ गावांचा सहभाग होता. यातून गावोगावी चांगली कामे झाली. यावर्षी ६८ गावांनी नोंदणी केली होती. त्यातील ५३ गावांतील तरुणांना व ग्रामस्थांना प्रशिक्षण मिळाले आहे. त्यातील ३२ गावे प्रत्यक्ष स्पर्धेत सहभागी झाली आहेत. त्यांच्या श्रमाला हातभार लावण्यासाठी महाश्रमदानचे आयोजन करण्यात आलेले होते. यात ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले होते.

करमाळा तालुक्यात दुसऱ्यांदा वॉटर कप स्पर्धा होत आहे. ८ एप्रिल ते २२ मे असे एकूण ४५ दिवस श्रमदान होणार आहे. जलसंधारणातून मनसंधारणकडे जाण्यासाठी ग्रामस्थांना त्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. ग्रामस्थांमध्ये जनजागृती करून त्यांच्या माध्यमातून बंधारे बांधणे, चर खोदणे, शेतातील पाणी शेतात जिरवणे, माती बंधारे तयार करणे, शोषखड्डे, आगपेटीमुक्त शिवार, नाला रुंदीकरण, खोलीकरण आदि कामे हाती घेण्यात आली आहेत. सहभागी गावांत मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. या कामांना हातभार लावण्याण्यासाठी महाराष्ट्र दिनी श्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते.

शासनाच्या सहकार्याने पानी फाउंडेशनच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धा राबवली जात आहे. या स्पर्धेत गावांच्या पुढाकारातून केलेले सामूहिक प्रयत्न महत्वाचे ठरणार आहेत. निवडणुकीमुळे प्रशासकीय यंत्रणा या उपक्रमांत सहभाग झाली नव्हती. तसेच निवडणुकीमुळे काही गावांत कमी प्रतिसाद मिळाला. पण आता निवडणुकीनंतर सर्वांनी आपापले गाव पाणीदार करण्यासाठी लक्ष दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details