सोलापूर- संयुक्त महाराष्ट्राचा आज 60 वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात अत्यंत साध्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत सोलापुरात 'महाराष्ट्र दिन' साजरा - कोरोना विषाणू
दरवर्षी महाराष्ट्र दिन हा मोठ्या कार्यक्रमासह पार पाडला जातो. मात्र, या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे अत्यंत साध्या पद्धतीने महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम पार पडला.
महाराष्ट्र दिन
दरवर्षी महाराष्ट्र दिन हा मोठ्या कार्यक्रमासह पार पाडला जातो. मात्र, या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे अत्यंत साध्या पद्धतीने महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी कार्यालयात एकाच ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.