महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वच्छ आणि सुंदर सोलापूरसाठी कटिबद्ध होऊ, पालिका आयुक्त दीपक तावरे - सुंदर सोलापूर

यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपायुक्त त्र्यंबक ढेगळे पाटील, गटनेते आनंद चंदनशिवे यांच्यासह मनपा सर्व खातेप्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोलापूर

By

Published : May 1, 2019, 10:55 AM IST

सोलापूर- आज १ मे महाराष्ट्र राज्याचा ५९ वा वर्धापन दिन, जागतिक कामगार दिन आणि सोलापूर महानगरपालिकेचा ५६ वा वर्धापनदिन महानगरपालिका आवारात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सोलापूर शहराच्या प्रथम नागरिक महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

स्वच्छ आणि सुंदर सोलापूरसाठी कटिबद्ध होऊ, पालिका आयुक्त दीपक तावरे

यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या १२ गुणवंत अधिकारी आणि कामगारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना पालिका आयुक्त दीपक तावरे यांनी सोलापूर महानगरपालिकेने डिजीटल पेमेंटसारख्या योजना राबवून नव्या तंत्रज्ञानाची कास धरली असल्याचे मत त्यांनी मांडले. त्याचबरोबर यापुढील काळात स्वच्छ आणि सुंदर सोलापूर शहर ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांसह शहरवासीयांनी कटिबद्ध राहावे असे आवाहनही केले.

यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपायुक्त त्र्यंबक ढेगळे पाटील, गटनेते आनंद चंदनशिवे यांच्यासह मनपा सर्व खातेप्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details