महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुंढरपुरात विठ्ठलाची महापूजा संपन्न; भगरे गुरुजींनी सपत्नीक केली पूजा - पांडुरंगाची महापूजा

दोन वर्षांतून पहिल्यांदाच माघ यात्रा पंढरपुरात भरविण्यात आली आहे. शनिवारी पहाटेच्या 2 सुमारास विठुरायाची शासकीय पूजा मंदिर समिती सदस्य भगरे गुरुजी यांनी सपत्नीक केली. तर कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी सपत्नीक रुक्मिणी मातेची महापूजा पार पडली.

भगरे गुरुजींनी सपत्नीक केली पूजा
भगरे गुरुजींनी सपत्नीक केली पूजा

By

Published : Feb 12, 2022, 9:21 AM IST

पंढरपूर -माघी शुद्ध एकादशी निमित्ताने पांडुरंगाची महापूजा विठ्ठल मंदिर समिती सदस्य भगरे गुरुजी यांनी सपत्नीक यांच्या हस्ते करण्यात आली. तर रुक्मिणी मातेची महापूजा विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी सपत्नीक केली. विठ्ठल मंदिर समितीकडून दिनदर्शिका व डायरी प्रकाशन सोहळा पार पाडण्यात आला.

पुंढरपुरात विठ्ठलाची महापूजा संपन्न

दोन वर्षांतून पहिल्यांदाच माघ यात्रा पंढरपुरात भरविण्यात आली आहे. शनिवारी पहाटेच्या 2 सुमारास विठुरायाची शासकीय पूजा मंदिर समिती सदस्य भगरे गुरुजी यांनी सपत्नीक केली. तर कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी सपत्नीक रुक्मिणी मातेची महापूजा पार पडली. विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात लाखो भाविकांनी एकच गर्दी केली आहे. गजर टाळ मृदुंगाचा आवाज विठुरायाच्या दरबारात घुमताही यावेळेस दिसून आला. विठ्ठल मंदिर समितीकडून मंदिर समितीची दिनदर्शिका व डायरी प्रकाशन सोहळ्यात विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य जळगावकर महाराज, विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेलेकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

विठ्ठलाची महापूजा संपन्न

ABOUT THE AUTHOR

...view details