सोलापूर - भीमा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूकीचा ( Bhima Cooperative Sugar Factory Election ) निकाल दोन फेरीत पूर्ण होणार आहे. याबाबत अधिकृत माहिती जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी दिली आहे. भीमा सहकारी साखर कारखाना ( Bhima Cooperative Sugar Factory ) निवडणुकीच्या निकालाच्या पहिल्या फेरीत २८ केंद्रावरील मतमोजणी निकाल हाती आला आहे.
भीमा परिवार पॅनल आघाडीवर -भाजप खासदार धनंजय महाडिक ( BJP MP Dhananjay Mahadik ) यांचा भीमा परिवार पॅनल ( Bhima Parivar Panel ) पहिल्या फेरीत आघाडीवर असल्याची प्राथमिक माहिती पहिल्या फेरीत समोर आली आहे. राजन पाटील, प्रशांत परिचारक यांचा भीमा बचाव पॅनल ( Bhima Bachav Panel ) पहिल्या फेरीत मागे फेकला गेला आहे. महाडिक समर्थकांनी पंढरपूर,मोहोळ आदी भागात जल्लोषाची तयारी केली आहे. पहिल्या फेरीत 28 केंद्रावर महाडिक गटाने मुसंडी मारली आहे.
मिळालेली मत-
पुळूज मतदार संघ -भीमा परिवार(महाडिक गट)
1)महाडिक विश्वराज धनंजय-5 हजार 826
2)वाघ विभीषण बाबा-5 हजार 621
-भीमा बचाव (राजन पाटील गट)
1) कल्याणराव पाटील-2 हजार 229
2) गुंड देवानंद रावसो-2 हजार 177
टाकळी सिकंदर मतदार संघ -भीमा परिवार (महाडिक गट)
1) कोकाटे संतोष-5 हजार 810,
2)चव्हाण सुनील रावसाहेब- 5 हजार 822
भीमा बचाव (राजन पाटील गट)
1)भोसले शिवाजी- 2 हजार 250
2)माने राजाराम दगडू-2 हजार 153
सुस्ते मतदार संघ-
भीमा परिवार गट(महाडिक गट)
1)नागटिळक तात्यासो-5 हजार 715
2)सावंत संतोष-5 हजार 537
-भीमा बचाव (राजन पाटील गट)
1)नायगुडे पंकज मचिंद्र -2 हजार 199
2)रणदिवे विठ्ठल दत्तात्र्यय-2 हजार 133