सोलापूर : सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पंढरपुरात माघी वारी यात्रेनिमित्त लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. पंढरपुरातील आश्रमात अनेक भाविक प्रसाद घेण्यासाठी, तसेच जेवणासाठी येत असतात. येथील संत निळोबा सेवा मंडळ या मठामध्ये काल रात्री भाविकांनी भगर, आमटी खाल्ल्यामुळे त्यांना विषबाधा झाली. यामध्ये १३७ भाविकांना याचा त्रास झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. हे भाविक नांदेड येथील असल्याचे समजते. काल रात्री दोन वाजता सर्व भाविकांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू जाणवून लागला, त्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
भाविकांना अन्नातून विषबाधा : एक फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथे तब्बल चार लाख भाविकांच्या उपस्थितीमध्ये पंढरपूरचा माघ वारी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. या वारीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक सहभागी झाले होते. माघ वारीचा सोहळा आनंदी वातावरणात भाविक साजरा करीत असतानाच तब्बल १३७ भाविकांना अन्नातून विषबाधा झाल्याची मोठी घटना घडली आहे. यापूर्वीही अशा विषबाधेचा घटना घडल्या आहेत. पंढरपूर वारीसाठी राज्याच्या कोनाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक पंढरीत जमत असतात. भाविकांच्या सोईसुविधासाठी प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत असते. सर्व दृष्टीने काळजी घेवूनही काही अशा घटना घडतात.