महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माढ्यातील निखिलचे यूपीएससी परीक्षेत यश, देशात ७४४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण - Solapur latets news

सोलापूर जिल्ह्यातील मुळचे माढ्याचे रहिवासी असलेल्या निखिल अनंत कांबळे यांनी देखील या परीक्षेत ७४४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत यश संपादन केले आहे. निखिलने पहिल्याच प्रयत्नात यश खेचुन आणले आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे कौतुक केले जात आहे.

Upsc results declared
Upsc results declare

By

Published : Aug 5, 2020, 9:43 AM IST


माढा (सोलापूर) - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले. या निकालात मराठी मुलांचीही छाप दिसून आली. सोलापूर जिल्ह्यातील मुळचे माढ्याचे रहिवासी असलेल्या
निखिल अनंत कांबळे यांनी देखील या परीक्षेत ७४४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत यश संपादन केले आहे. निखिलने पहिल्याच प्रयत्नात यश खेचुन आणले आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे कौतुक केले जात आहे.

निखिल अनंत कांबळे (माढेकर) यांचे प्राथमिक शिक्षण ए.डी.जोशी सोलापूर, माध्यमिक शिक्षण ए.डी जोशी ज्युनिअर कॉलेज, सोलापूर येथे तर इंजिनिअरिंगचे शिक्षण गव्हर्मेंट कॉलेज पुणे येथे झाले. त्यानंतर गेल्या दोन वर्षापासून ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते. जिद्द कष्ट व आत्मविश्वास प्रयत्नाच्या जोरावर त्याने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले.

निखिलचे वडील अनंंत कांबळे हे न्यू इंडिया इन्शुरन्स शिवाजीनगर पुणे येथे ॲडमिनीस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. मूळचे माढ्याचे रहिवासी असणाऱ्या निखिलचे आजोबा संभाजी कांबळे यांचा तो नातू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details