माढा(सोलापुर) -उपविभागीय माढा महावितरण कार्यालयांतर्गत येणाऱ्या उपळाई बु. गावातील शितोळे वस्तीवर डीपीवर काम करत असताना, शॉक लागून माढ्यातील एका कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. नितीन भानुदास चवरे (वय ३५ रा. चवरे वस्ती माढा) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
माढा: विजेच्या धक्क्याने कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू - Solapur District Latest News
उपविभागीय माढा महावितरण कार्यालयांतर्गत येणाऱ्या उपळाई बु. गावातील शितोळे वस्तीवर डीपीवर काम करत असताना, शॉक लागून माढ्यातील एका कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली.
महावितरणमध्ये कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत
नितिन चवरे हे गेल्या काही वर्षांपासून माढा महावितरणच्या उपविभागीय कार्यालयांतर्गत उपळाई येथे कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होते. गुरुवारी दुपारी उपळाई (बुद्रुक) येथील शितोळे वस्तीवरील डीपीवर काम करत असताना, शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माढा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. माढ्यातील चवरे वस्ती येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.