पंढरपूर -सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण सोडत बुधवारी तहसील कार्यालयात घेण्यात आले. या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीमध्ये महिलांचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळाले. सुमारे 50 टक्क्यांहून अधिक सरपंच पदांवर महिलाराज आहे. यामुळे पुरुषांच्या बरोबरीने महिलाही गावचा कारभार पाहणार आहेत.
पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, मोहोळ तालुक्यातील आरक्षण जाहीर
पंढरपूर तालुक्यातील 91 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर झाले. त्यात अनुसूचित जमातीसाठी तारापूर हे महिला वर्गासाठी तर दोन जागा पुरुष वर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले. तर अनुसूचित जातीसाठी पुरुषांसाठी 10 तर महिलांसाठी जागा सरपंच पदासाठी होत्या. इतर मागासवर्गीयांमध्ये पुरुषांसाठी तेरा व 13 महिला गावाचा कारभार चालू होणार आहे. तसेच सर्वसाधारण खुल्या गटासाठी 23 पुरुष कारभारी तर ते 20 महिला कारभारासाठी सरपंच आरक्षण असणार आहे.
मंगळवेढा तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडतीत 10 जागा मागासवर्गीयांसाठी, 21 जागा इतर मागास वर्गासाठी तर 48 जागा या सर्वसाधारणसाठी राखीव झाल्या. या वेळी झालेल्या सोडतीत मागील 23 ग्रामपंचायतींचे आरक्षण राखीव नसल्यामुळे त्यातील 10 ग्रामपंचायतीत अनुसूचित जाती राखीव ठेवण्यात आल्या. तर 21 ओबीसी आरक्षणामधील 11 जागा चिठ्ठीद्वारे निश्चित झाल्या.
सांगोला तालुक्यातील 76 ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जमातीसाठी एक, अनुसूचित जातीसाठी प्रत्येकी 15, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी पुरुष व महिला 21 तसेच राहिलेल्या सर्वसाधारण महिला व पुरुषांसाठी 39 ग्रामपंचायतींची सोडत झाली.
ग्रामपंचायतीवर 50 टक्के महिलाराज
राज्य निवडणूक आयोगाने सरपंच पदाचे आरक्षण सोडत 2011 ची जनगणना गृहीत धरून व चक्राकार पद्धतीने काढली. यात 50 टक्के महिलांना संधी देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी सर्वसाधारण जागेसाठी आरक्षण निश्चित झाले आहे व ज्या ठिकाणी आघाडीची सत्ता आहे, त्या ठिकाणी मोठा पेच निर्माण झाला आहे. सरपंच कोणाला करायचे, हा मोठा अडचणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठ्या घोडेबाजाराची शक्यता नाकारता येत नाही. मात्र आरक्षणामुळे गावातील सत्ताधारी पॅनल स्थापन करण्याचे मोठे आव्हान आहे. कारण विरोधी पॅनलमधील आरक्षित जागेतील निवडून आल्यामुळे सत्तेचा पेच निर्माण झाला जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायत मध्ये हे चित्र दिसत आहे. आरक्षण सोडती वेळी प्रत्येक सदस्याची नाव नोंदणी करून व सॅनिटायझर करून प्रवेश दिला जात होता.