सोलापूर -लोकमंगल सार्वजनिक वाचनालयातर्फे देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. द. तु. पाटील यांना 'चैत' कादंबरीसाठी, शर्मिला फडके यांना 'फोर सिझन्स' कादंबरीसाठी तर विश्राम गुप्ते यांना 'लेखकाची गोष्ट' या ललित लेखनासाठी हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. याशिवाय, मराठी भाषा संशोधन मंडळाचे संचालक डॉ. प्रदीप कर्णिक यांनादेखील हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांनी मराठी संशोधन पत्रिकेचे संपादन केले आहे.
गेल्या चार वर्षांपासून लोकमंगल वाचनालयाकडून राज्यस्तरीय लोकमंगल साहित्य पुरस्कार दिले जात आहेत. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे. यंदाचा पुरस्कार सोहळा १४ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता निर्मलकुमार फडकुले सभागृहात संपन्न होणार आहे.