सोलापूर - शहरातील गुलमोहर अपार्टमेंट परिसरात अनोखा विवाह सोहळा पार पडला. उच्च शिक्षित असलेल्या जोडप्याचा विवाह हा अवघ्या 50 वऱ्हाडी मंडळीच्या उपस्थिती सर्व नियमांचे पालन करत पार पडला.
मोजक्याच मंडळीच्या उपस्थितीत पार पडला विवाह सोहळा, गॅलरीतून टाकल्या अक्षता - सोलापुरात अपार्टमेंटमधे लग्न
शहरातील वसंत विहार परिसराच्या नजीक असलेल्या गुलमोहर अपारमेंट परिसरात रविवारी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांच्या शुभमुहूर्तावर अनोख्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. फिजिकल डिस्टंस पाळत उपस्थित 50 वऱ्हाडी मंडळीनी सॅनिटायझरद्वारे हात स्वच्छ करून आणि तोंडाला मास्क बांधून वधू-वरांवर फुलांच्या पाकळ्या अन् अक्षता टाकल्या. विशेष म्हणजे यावेळी गुलमोहर अपार्टमेंटमधील शेकडो रहिवाशांनी आपापल्या गॅलरीमध्ये येऊन वधू-वरांवर अक्षतांची टाकल्या.
शहरातील वसंत विहार परिसराच्या नजीक असलेल्या गुलमोहर अपार्टमेंट परिसरात रविवारी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांच्या शुभमुहूर्तावर अनोख्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. फिजिकल डिस्टंस पाळत उपस्थित 50 वऱ्हाडी मंडळीनी सॅनिटायझरद्वारे हात स्वच्छ करून आणि तोंडाला मास्क बांधून वधू-वरांवर फुलांच्या पाकळ्या अन् अक्षता टाकल्या. विशेष म्हणजे यावेळी गुलमोहर अपार्टमेंटमधील शेकडो रहिवाशांनी आपापल्या गॅलरीमध्ये येऊन वधू-वरांवर अक्षतांची टाकल्या.
गुलमोहर सोसायटीत राहणारे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर दशरथ माने यांची कन्या श्रद्धा हिचा विवाह सांगली -आष्टा येथील डॉक्टर विजयसिंह जाधव यांचे सुपुत्र अजिंक्य यांच्याशी सहा महिन्यांपूर्वी ठरला होता. सोलापुरातील सुशील रसिक सभागृहात २४ मे रोजी धुमधडाक्यात हा विवाह सोहळा करण्याचे नियोजन केले होते. मात्र कोरोनाचे देशावर आलेले संकट आणि लॉकडाऊन यामुळे विवाह कसा करायचा याचे कोडे त्यांना पडले होते. गुलमोहर सोसायटीतील रहिवाशी आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या संकल्पनेतून हा सोहळा गुलमोहर सोसायटीच्या प्रांगणात करण्याचे नियोजन केले आणि माने- जाधव कुटुंबीयांनी याला होकार दिला. त्यामुळे रविवारी 24 मे रोजी बारा वाजून 30 मिनिटांनी गुलमोहर सोसायटीच्या प्रांगणात वधू-वरांवर अपार्टमेंटमधील शेकडो रहिवाशांनी अक्षता टाकल्या. वधू-वर अन जवळ 50 जणांची उपस्थिती या लग्नाला होती. लॉकडाऊनचे नियम पाळून हे शुभमंगल पार पडले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले उपस्थित होते.