महाराष्ट्र

maharashtra

सोलापूर जिल्ह्यात संचारबंदीची कठोर अंमलबजावणी, जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा चालू

By

Published : May 9, 2021, 5:21 PM IST

सोलापूर जिल्ह्यात रोज हजारो कोरोनाग्रस्त नवीन रुग्ण आढळून येत आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर जिल्ह्यात 9 मे ते 15 मेपर्यंत कडक निर्बंध लादले आहेत. पंढरपूर शहर व तालुक्यात प्रशासनाकडून नागरिकांवर कठोर निर्बंध लादण्यात आले. त्याची अंमलबजावणी पंढरपूर शहर व तालुक्यात आज (दि. 9 मे) करण्यात आली.

पंढरपूर
पंढरपूर

पंढरपूर (सोलापूर) -सोलापूर जिल्ह्यात रोज हजारो कोरोनाग्रस्त नवीन रुग्ण आढळून येत आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर जिल्ह्यात 9 मे ते 15 मेपर्यंत कडक निर्बंध लादले आहेत. पंढरपूर शहर व तालुक्यात प्रशासनाकडून नागरिकांवर कठोर निर्बंध लादण्यात आले. त्याची अंमलबजावणी पंढरपूर शहर व तालुक्यात आज (दि. 9 मे) करण्यात आली. पोलीस प्रशासनाकडून मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता. माळशिरस, माढा, सांगोला, मंगळवेढा, करमाळा तालुक्यात संचारबंदीची प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी केली आहे.

पंढरपूर नगर परिषदेकडून आरोग्य संदर्भात उपाय योजना

पंढरपूर शहरात कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील प्रत्येक भागामध्ये ट्रॅक्टरच्या माध्यमातून विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जंतुनाशक फवारणी करण्यात आली पंढरपूर नगर परिषदेकडून नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती होण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

पोलिसांकडून नागरिकांना दंडूक्याचा प्रसाद

पंढरपूर शहरात पोलिसांकडून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पंढरपूर शहरात विनाकारण फिरणार्‍या नागरिकांना पोलिसांकडून दंडूक्याचा प्रसाद देण्यात आला. कोरोनाबाबत पोलीस प्रशासनाकडून विनाकारण फिरणाऱ्या निर्बंध घातले जात आहेत. शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही परगावातील व्यक्तीला पंढरपुरात प्रवेश दिला जात नाही.

मंगळवेढा, माळशिरस, करमाळा, सांगोल्यात प्रशासनाकडून निर्बंध

जिल्हा प्रशासनाकडून आजपासून अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यात नागरिकांना फिरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यातूनच आठ दिवसाची कठोर संचारबंदी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केली आहे. यातील पंढरपूर व मंगळवेढा दोन्ही तालुक्यात निवडणुकीनंतर कोरोना कहर केला आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांमध्ये प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर माळशिरस, करमाळा, सांगोला, बार्शी, माढा या शहर व तालुक्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्हा प्रशासनाकडून तालुक्यात योग्य ती दक्षता घेतली जात आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा -सोलापुरात रेशन दुकानावर नागरिकांच्या लांबच लांब रांगा

ABOUT THE AUTHOR

...view details