पंढरपूर (सोलापूर) - शहरातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ४ ते १४ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, आमदार भारत भालके, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी सागर कवडे, तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, वैद्यकीय अधिकारी डॉ. बोधले, डॉ जयश्री ढवळे, यासह खासगी रुग्णालयांमधील डॉक्टरांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे.
पंढरीत दहा दिवसांचा लॉकडाऊन होण्याची शक्यता
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ४ ते १४ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन लागू होण्याची शक्यता आहे.
पंढरपूर कोरोना घडामोडी
लॉकडाऊन संदर्भातील अध्यादेशही बैठकीत निघण्याची शक्यता आहे. ३ ऑगस्टला रात्री १२ वाजल्यापासून याची कडक अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
पंढरपूरच्या शासकीय विश्रामगृह येथे शहरातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे, मनसे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, संतोष पवार, संदीप मांडवे, इत्यादी उपस्थित आहेत.