सोलापूर -राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. एक जुन नंतर लाॅकडाऊन शिथील करण्याचा विचार मंत्रीमंडळाकडून केला जात असल्याची माहिती, राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
संचारबंदीबाबत एक जून नंतर निर्णय
मागील काही दिवसांपासून राज्यात आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचे चित्र आहे. लसीकरण मोहिमेला देखील वेग आला आहे. त्याचबरोबर राज्यात येणारी तिसरी लाट कशापद्धतीने रोखता येईल यावर विचार सुरू आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून 1 जून नंतर राज्यात लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाकडून घेतला जाऊ शकतो, असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटले आहे.
1 जून नंतर लॉकडाऊन शिथील होण्याची शक्यता पंढरपूर व माळशिरस तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट
जिल्ह्यातील शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाटी उपाय-योजना करण्यात येत आहेत. पंढरपूर माळशिरस तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव शहरी व ग्रामीण भागात नव्याने आढळून येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून त्यासंदर्भात योग्य ती दक्षता घेतली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
उजणी पाणी प्रश्नावर बोलणे टाळले
उजनीच्या पाणी प्रश्नावरून सेलापूर व इंदापूर तालुक्यात आंदोलने होत आहेत. याबाबत पालकमंत्री भरणे यांना विचारले असता, त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. उजनी संदर्भात बोलण्याची इच्छा नाही, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना व्यवस्थितरीत्या समजण्यात आले आहे. त्यामुळे इथून पुढे कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.
हेही वाचा -मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात विरोधकांनी उधळलेली मुक्ताफळे दुर्दैवी - खासदार सुनील तटकरे