सोलापूर- ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेने मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी घरफोडी उघडकीस आणली आहे. अतिवृष्टीमुळे सुरज रावजी कापसे (वय 29) हे घराला कुलूप लावून दुसरीकडे राहण्यासाठी गेले होते. त्यानंतर चोरट्याने त्यांच्या घरातील 14 तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. याचा छडा लावून स्थानिक गुन्हे शाखेने शंभर टक्के रिकव्हरी केली आहे.
अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यात 14 व 15 ऑक्टोबर रोजी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबियांना आपली घर सोडून जीव वाचवण्यासाठी स्थलांतरीत व्हावे लागले होते. याच दरम्यान सुरज कापसे यांनी देखील अतिवृष्टीमुळे आपले राहते घर सोडून 15 ते 17 ऑक्टोबर रोजी दुसरीकडे राहण्यास गेले होते. त्यामुळे बंद घराचा फायदा उचलून चोरट्यांनी घरातील कपाटामध्ये ठेवलेले 14 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते. या चोरीची नोंद मंद्रुप पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
हेही वाचा-बीड : २५ हजाराची लाच घेताना शाखा अभियंत्यास रंगेहात पकडले