महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माढा मतदारसंघ: मोहिते पाटलांच्या पाठिंब्याने निंबाळकरांनी गाठली दिल्ली; संजयमामांना पराभवाचा धक्का - रणजितसिंह नाईक निंबाळकर

माढ्यात संजयमामा शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. येथे भाजपचे रणजिंतसिंह मोहिते निंबाळकर विजयी झाले आहेत. त्यामुळे पवारांचा प्लॅन फसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

संजयमामा शिंदे विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर

By

Published : May 23, 2019, 6:10 AM IST

Updated : May 23, 2019, 6:48 PM IST

LIVE UPDATE -

  • 5.10 - निंबाळकर 70 हजार मतांनी आघाडीवर
  • 2.50 - रणजितसिंह नाईक निंबाळकर 30 हजार मतांनी आघाडीवर
  • 12.50 - नवव्या फेरीअखेर निंबाळकर 13 हजार मतांनी आघाडीवर
  • 12.00 - सहाव्या फेरीअखेर रणजितसिंह नाईक निंबाळर 6 हजार 600 मतांनी आघाडीवर
  • 11.10 - चौथ्या फेरीअखेर निंबाळकर 1 हजार 800 मतांनी आघाडीवर
  • 10.30 - तिसऱ्या फेरीअखेर निंबाळकर 200 मतांनी आघाडीवर
  • 9.25 - दुसऱया फेरीअखेर रणजिंतसिंह नाईक निंबाळकर 1 हजार मतांनी आघाडीवर
  • 8.50 - रणजितसिंह नाईक निंबाळकर आघाडीवर
  • 8.00 - मतमोजणीला सुरुवात

सोलापूर- माढा मतदारसंघात राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का बसला आहे. संजयमामा शिंदे यांचा पराभव करत भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विजयी झाले आहेत. सुरुवातीला काटे की टक्कर असलेली ही लढत नंतर मात्र एकतर्फी झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे पवारांचा प्लॅन फसल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत तुल्यबळ होती. निवडणुकीपुर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील बऱ्याच नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या मतदारसंघात रंगत निर्माण झाली होती. माढा लोकसभेसाठी ६२.५३ टक्के मतदान झाले होते. आज लागलेल्या निकालानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या गडाला धक्का देत दिल्ली गाठली आहे.

मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाने रंगत

माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला धक्का बसला. मोहिते पाटलांच्या प्रवेशाने या निवडणुकीत रंगत निर्माण झाली होती. तर विजयसिंह मोहिते पाटील यांनीही भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिला होता.

२०१४ ची परिस्थिती

२०१४ ची परिस्थिती पाहिली तर येथून विजयसिंह मोहिते पाटील यांनी युतीचे उमेदवार सदाभाऊ खोत यांचा पराभव केला होता. मोदी लाटेतही मोहिते पाटील निवडूण आले होते. मात्र, यावेळी मोहिते पाटील यांनी पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या तिकीटासाठी पक्षाकडे आग्रह केला होता. मात्र, अंतर्गत विरोधामुळे रणजितसिंह यांना तिकीट नाकारले होते. त्यामुळे रणजितसिंह यांनी राष्ट्रवादीविरोधात बंडाचे निशाण उगारले होते.

Last Updated : May 23, 2019, 6:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details