महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक; शांतता कमिटी सदस्यावर गावठी दारू विक्रेत्याचा प्राणघातक हल्ला - दारू माफियांच्या हल्ल्यात नागरिक जखमी

शांतता कमिटी सदस्याला एका गावठी दारू विक्रेत्याने जबर मारहाण केल्याने खळबळ उडाली.

solapur
दारू विक्रेत्याच्या मारहाणीत जखमी झालेले नागरिक

By

Published : Aug 22, 2020, 9:53 PM IST

सोलापूर - शांतता कमिटी सदस्याला एका गावठी दारू विक्रेत्याने जबर मारहाण केल्याने खळबळ उडाली. याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अजय नागेश वाघमोडे( वय 26 वर्ष, रा हब्बू वस्ती, डेगाव नाका, सोलापूर),मुद्रिका नागेश वाघमोडे (वय 50 वर्ष),राज नितीन कांबळे(वय 12 रा, हब्बू वस्ती सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत.

हब्बू वस्ती येथे शनिवारी सकाळी ड्रेनेजच्या पाईपलाईनच्या कामासाठी फरश्या आणून ठेवल्या होत्या. ते उचलण्याच्या कारणावरून विजय नागमोडे, बाबा वाघमारे, शिवा नागमोडे यांनी लोखंडी रॉड व तलवारीने डोक्यात मारून जखमी केल्याची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.

नागमोडे यांचा हातभट्टी दारू विक्रीचा व्यवसाय असल्याची माहिती जखमी अजय वाघमोडे व त्यांच्या आईने माध्यमांशी बोलताना दिली. ही हाणामारी ऐकताच पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन हाणामारी नियंत्रित केली. व जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल पाठवले. शनिवारी दिवसभर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ABOUT THE AUTHOR

...view details