महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपूरच्या पोटनिवडणुकीवर कोरोना नियमावलीच्या मर्यादा - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अपडेट

जिल्हा प्रशासनाने सोलापूर शहरासह जिल्ह्यात आचारसंहिता लागू केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच निवडणुका होत आहेत. या पोटनिवडणुकीमुळे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या पोटनिवडणुकीवर कोरोना नियमावलीची अनेक बंधने आली आहेत.

सोलापूर
सोलापूर

By

Published : Mar 18, 2021, 5:44 PM IST

सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक 17 एप्रिलला होणार आहे. जिल्हा प्रशासनाने सोलापूर शहरासह जिल्ह्यात आचारसंहिता लागू केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच निवडणुका होत आहेत. या पोटनिवडणुकीमुळे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या पोटनिवडणुकीवर कोरोना नियमावलीची अनेक बंधने आली आहेत. उमेदवारांना प्रचार करताना कोणतीही सभा, रॅली घ्यावयाची असल्यास गर्दीच्या मर्यादा असणार आहेत.

सोलापूर

शासनची परवानगी घेऊनच कोपरा बैठका, सभा घ्याव्या लागतील, त्याही मर्यादित कार्यकर्त्यांच्या व नागरिकांच्या उपस्थितीत. याबाबत आज गुरुवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माहिती सांगितली. कोरोनामुळे मतदान केंद्राची संख्या वाढवली आहे. एका केंद्रावर 1500 ऐवजी फक्त 1000 (एक हजार ) मतदारांनाच मतदान करता येणार आहे. यावेळी पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पोटनिवडणुकीत 3 लाख 39 हजार 540 मतदार

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात एकूण 3 लाख 39 हजार 540 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 77 हजार 387 पुरुष 387 मतदार आहेत. तर 1 लाख 62 हजार 148 स्त्री मतदार आहेत. यामध्ये 5 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. पोटनिवडणुकीत कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. यासाठी 20 पथके तैनात करण्यात आली आहेत. या पोटनिवडणुकीत आरोग्य खाते देखील सज्ज ठेवण्यात आले आहे. 524 केंद्रावर 1210 आशा सेविका व वैद्यकीय पथक, 550 थर्मल गन, 4500 फेस शिल्ड, 4500 हॅन्डग्लोज, 5000 हजार मास्क, 5 लिटर सॅनिटायजरची व्यवस्था केंद्रावर केली आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम

  • 23 मार्च पासून उमेदवारी दाखल करणे.
  • उमेदवारी दाखल अंतिम मुदत 30 मार्च
  • अर्ज मागे घेण्याची मुदत 3 एप्रिल
  • मतदान दिनांक 17 एप्रिल
  • मतमोजणी दिनांक 2 मे

    ठळक बाबी-
  • 1050 बॅलेट युनिट, 1016 कंट्रोल युनिट, 1009 व्हीव्हीपॅट असणार
  • 524 मतदान केंद्रे
  • निवडणूक ईव्हीएम मशिनवर होणार
  • 3 हजार 150 मतदान कर्मचारी, 60 विभागीय अधिकारी, 550 पोलीस कर्मचारी, एकूण 3 हजार 965 जणांची नियुक्ती.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details