महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार निवृत्त सरन्यायाधीश उदय लळीत यांना जाहीर - जीवनगौरव पुरस्कार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा व मानाचा जीवनगौरव पुरस्कार सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश उदय उमेश लळीत यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराची घोषणा प्रभारी कुलगुरु डॉ. राजनीश कामत यांनी गुरूवारी केली.

retired Chief Justice Uday Lalit
निवृत्त सरन्यायाधीश उदय लळीत

By

Published : Jul 27, 2023, 7:57 PM IST

सोलापूर:सोलापूर ही जन्मभूमी, कर्मभूमी व ऋणानुबंध असणाऱ्या समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तिला विद्यापीठाच्या वतीने जीवनगौरव हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन सन्मानीत केले जाते. यंदाच्या या पुरस्काराचे मानकरी श्री. लळीत हे ठरले आहेत. विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने लळीत यांना पुरस्कार स्वीकारण्यासाठी विनंती केली, आणि त्यांनी ती मान्य केली आहे. 51 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ अशा स्वरुपाचा हा पुरस्कार आहे.

सोमवारी विद्यापीठाचा 19 वा वर्धापन दिन होत आहे. सकाळी आठ वाजता कुलगुरू डॉ. कामत यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर नऊ वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या समारंभास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांची मुख्य उपस्थिती असणार आहे.डॉ. गौतम कांबळे, योगिनी घारे, डॉ शिवकुमार गणपूर, श्रेणिक शाह, डॉ. रवींद्र चिंचोलकर, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे आदींच्या उपस्थितीत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. इतर पुरस्कारांमधे

उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कारासाठी एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तसेच प्राचार्य डॉ. शंकर नवले यांची उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कारासाठी निवड झाली. प्राचार्य डॉ. राजशेखर हिरेमठ यांनाही उत्कृष्ठ प्राचार्य हा पुरस्कार जाहिर झाला. उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (विद्यापीठ): डॉ. रवींद्र चिंचोलकर, सामाजिकशास्त्रे संकुल, डॉ. राजीवकुमार मेंते, संगणकशास्त्र संकुल यांना घोषीत झाले.

उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (महाविद्यालय): प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, डी. बी. एफ. दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, तसेच वालचंद कॉलेजचे डॉ. चंद्रकांत चव्हाण यांना जाहिर झाला उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार: डॉ. अभिजीत जगताप, डॉ. उमराव मेटकरी, उपकुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर. यांना जाहिर झाले आहेत.

जस्टीस उदय उमेश लळी भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते. एन. व्ही. रमणा यांच्या कार्यकाळ संपत आल्या नंतर त्यांनीलळीत हे आपले उत्तराधिकारी असतील, अशी शिफारस केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यापूर्वी उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम न करणारे उदय लळीत हे दुसरे सरन्यायाधीश होते जे वकिलीतून ते थेट या पदापर्यंत पोहोचले होते असे त्यांच्या बाबतीत सांगितले जायचे.

ABOUT THE AUTHOR

...view details