सोलापूर -शेतात झालेल्या पेरणीच्या वादातून कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना घडली. याघटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. प्रल्हाद गायकवाड व दत्ता प्रल्हाद गायकवाड या बाप-लेकावर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी या गावात घडली. या जीवघेण्या हल्ल्यात सतीश जाधव (वय ४०) आणि त्यांची आई मंगल सुखदेव जाधव हे जखमी आहेत. आरोपींनी पाण्याच्या चारीवरून झालेल्या मागील भांडणाचा राग मनात धरून हा हल्ला केला. शेतात पेरणी करायची नाही, अशी धमकी देवून शिवीगाळही केली. जाधव माय-लेकांच्या हातावर कुऱ्हाडीने हल्ला करून गंभीर जखमी केले.