महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तरडगाव बंधाऱ्यातून गळती सुरूच; ठेकेदारांचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर

सीना नदीतील तरडगाव बंधाऱ्याला दरवाजे बसवून काही प्रमाणात पाणी आडवण्याचा प्रयत्न होत असला तरीही, ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे बंधाऱ्यांना बसवण्यात आलेल्या दरवाजांमधून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे.

By

Published : Oct 31, 2019, 2:16 PM IST

ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे सीना नदीतील बंधाऱ्यांना बसवण्यात आलेल्या दरवाजांमधून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे.

सोलापूर - यावर्षी लांबलेल्या परतीच्या पावसाने सीना नदीत मोठ्या प्रमाणात प्रवाह सुरू आहे. या नदीतील तरडगाव बंधाऱ्याला दरवाजे बसवून काही प्रमाणात पाणी आडवण्याचा प्रयत्न होत असला तरीही, ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे बंधाऱ्यांना बसवण्यात आलेल्या दरवाजांमधून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असून, तत्काळ गळती न थांबवल्यास त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे सीना नदीतील बंधाऱ्यांना बसवण्यात आलेल्या दरवाजांमधून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे.

करमाळा तालुक्यातील सीना नदीवर कोल्हापूर पध्दतीचा बंधारा असून, या बंधाऱ्याला तीन वर्षांपूर्वी पाणी आले होते. त्यावेळीही या बंधाऱ्यातील काही दरवाजे तुटल्याने वाहून गेले होते. त्यामुळे ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन ठेकेदाराच्या साहाय्याने दरवाजे बसवले. यावर्षी ज्यादा पाऊस झाल्याने पुन्हा अशी परिस्थिती टाळण्यासाठी गावकऱ्यांकडून बंधाऱ्याचे दरवाजे दुरूस्त करण्याची मागणी होत आहे.

हा बंधारा 60 एमसीएफटी क्षमतेचा असून या पाण्यावर तरडगाव, पाडळी, खडकी, आळजापूर व जवळा या गावातील शेतकऱ्यांना फायदा होतो. तरडगाव बंधाऱ्याला जवळपास 297 दरवाज्यांची गरज आहे. मात्र, शासनाने दोनशे दरवाजे दिल्याने अन्य दरवाज्यांमधून पाणी वाहून जात आहे. तसेच जुन्या लोखंडी दरवाज्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. परंतु, शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या डागडुजीचे प्रयत्न होत नसल्याने शेतकरी नाराज आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details