महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ब्रिटिशकालीन मंडईचे रूपडे पालटणार, लक्ष्मी मंडई होणार अत्याधुनिक - laxmi vegetable market

ब्रिटिश काळातील लक्ष्मी मंडई शहराच्या मध्यवर्ती भागात असून या मंडईचा केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेच्या अंतर्गत विकास करण्यात येणार आहे. मंडईत येणाऱ्या ग्राहकांसाठी अनेक सोयी सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती महापौरांनी दिली आहे.

laxmi vegetable market will developed soon
महापौर श्रीकांचन्ना यन्नम

By

Published : Dec 27, 2019, 1:09 PM IST

सोलापूर -शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या लक्ष्मी मंडईचा पूर्नःविकास करण्यात येणार आहे. शंभर वर्षे जून्या असलेल्या भाजी मंडईचे अत्याधुनिकीकरण करण्यासाठी सोलापूरच्या महापौर श्रीकांचन्ना यन्नम आणि माजी पालकमंत्री आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी मंडईची पाहणी केली.

ब्रिटिशकालीन मंडईचे रूपडे पालटणार, लक्ष्मी मंडई होणार अत्याधुनीक

हेही वाचा - अन्न व नागरी पुरवठा कार्यालयाच्या कामात 'एजंटगिरी'चा सुळसुळाट

ब्रिटिश काळातील लक्ष्मी मंडई शहराच्या मध्यवर्ती भागात असून या मंडईचा केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेच्या अंतर्गत विकास करण्यात येणार आहे. मंडईत येणाऱ्या ग्राहकांसाठी अनेक सोयी सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.

भाजी मार्केट परिसराचा विकास करताना येथील ओट्यावर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्याला तेथेच जागा देण्यात येणार आहे. तसेच ज्यांच्याकडे गाळा आहे त्यांनाही तेथेच गाळा उपलब्ध करून देणार असल्याचे महापौर म्हणाल्या. पालिका प्रशासनास तेथील व्यापारी वर्गाने सहकार्य करण्याचे अवाहन यावेळी त्यांनी केले. या पाहणीवेळी शहर उत्तरचे आमदार व सोलापूरचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापालिका आयुक्त दीपक तावरे, नगरसेवक अमर पुदाले राजकुमार पाटील संजय कनके, संदीप कारंजे, सारिका अकुलवार, विजय राठोड तसेच मनपा अधिकारी स्मार्ट सिटीचे अधिकारी यांची उपस्थिती होती.

हेही वाचा -खनिज तेलाच्या दराचा गेल्या तीन महिन्यातील उच्चांक; प्रति बॅरल ६७ डॉलर!

ABOUT THE AUTHOR

...view details