पंढरपूर- माढा तालुक्यातील बारलोणी संशयित गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या सोलापूर गुन्हे अन्वेषण विभाग ग्रामीण पथकावर जमावाने हल्ला केल्याची घटना घडली होती. या हल्ल्याच्या घटनेतील मुख्य आरोपी असलेले राहुल सर्जेराव गुंजाळ, यशवंत दशरथ गुंजाळ, अनिल दशरथ गुंजाळ हे फरार होते. त्यांना जेरबंद करण्यात कुर्डूवाडी पोलिसांना यश आले आहे.
बारलोणी येथे पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींच्या आवळल्या मुसक्या - माढा आणि कुर्डूवाडूी पोलीस
कव्हे-बारलोणी रोडवर कुर्डूवाडी पोलीस पथकाने छापा टाकून तिघा फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींना माढा न्यायालयाने चार दिवस (१३ जानेवारी पर्यंत) पोलीस कोठडी दिली आहे.
कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमानाजी केंद्रे यांना गुप्तहेर कडून कव्हे-बारलोणी रोडवर एका ठिकाणी तिघेजण लपून बसले असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्याा आधारे पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कव्हे-बारलोणी रोडवर कुर्डूवाडी पोलीस पथकाने छापा टाकून तिघा फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींना माढा न्यायालयाने चार दिवस (१३ जानेवारी पर्यंत) पोलीस कोठडी दिली आहे.
काय आहे प्रकरण-
माढा तालुक्यातील बारलोणी येथे सोने व चांदी गैरव्यवहार प्रकरणात आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या सोलापूर ग्रामीण पोलीस पथकावर जमावाने भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यात शंकर गुंजाळ या गुन्हेगाराला गुन्हेगारांना पळवण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये महिलांचाही सहभाग होता. जमावाकडून पोलीस वाहनावर तुफान दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे तीन पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले होते तर वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या जमावातील सहभागी असलेल्या 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.