महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी - महात्मा जोतिबा फुले जयंती बद्दल बातमी

शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संघटनेचे सदस्य व पदाधिकाऱ्यांनी महात्मा फुलेंना अभिवादन केले.

सोलापूर
सोलापूर

By

Published : Apr 12, 2021, 3:46 PM IST

सांगोला (सोलापूर) -सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने दिलेल्या नियमावलींचे पालन करत महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली.

स्टेशन रोड येथील तोरणा मुख्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेवक गजानन बनकर व व्यापारी गणेश दौंडे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले."सामाजिक विषमतेला खतपाणी घालणाऱ्या धर्म आणि रूढी परंपरांचा बिमोड करण्यासाठी शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करणारे महान समाजसुधारक, क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचे कार्य व विचार समाजाला प्रेरक ठरतील असे उद्गार नगरसेवक गजानन बनकर यांनी व्यक्त केले, यावेळी संघटनेचे सदस्य व पदाधिकाऱ्यांनी महात्मा फुलेंना अभिवादन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details