सोलापूर - देशात सरकार आणि विरोधक राजकीय आघाड्यांवर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी ट्विटर वार सुरू आहे. सोलापुरात मात्र, बुधवारी एका अंगणवाडी सेविकेने आपल्या क्रांतिगीताद्वारे सरकारच्या धोरणांवर शाब्दिक आसुडाचे फटकारे ओढले आहेत. निमित्त होतं शासकीय कर्मचारी आंदोलनाचं. या अंगणवाडी सेविकेनं तिच्या धारधार ग्रामीण शब्द रचनेतून कष्टकरी वर्गाचं दुःख तर मांडलेचं, त्याचबरोबर सत्ताधारी सरकारचे वाभाडं देखील आपल्या गितातून काढले आहेत. चंपाबाई भगवान जाधव असे त्या अंगणवाडी सेविकेचे नाव आहे.
मोर्चा बघुन दडत्यात... कामगार प्रश्नी अंगणवाडी सेविकेचा क्रांती गीतातून सरकारवर आसूड - बालवाडी शिक्षिका
चंपाबाई या माढा तालुक्यातील उपळाईच्या रहिवासी आहेत.1990 ला पहिल्यांदा बालवाडी शिक्षिका म्हणून त्या सेवेत रूजू झाल्या होत्या. पुढे वर्ष 2000 मध्ये त्या अंगणवाडी सेविका झाल्या. त्यांना लहानपणापासूनचं गाणी आणि कवितांचा छंद आहे. त्यांनी आतापर्यंत कामगार,स्त्री, बचतगट, शिक्षण, ऐक्य आणि जात्यावरची असंख्य गाणी लिहिली आहेत. त्याची एक झलक आजच्या आंदोलनस्थळी पाहायला मिळाली.
चंपाबाई या माढा तालुक्यातील उपळाईच्या रहिवासी आहेत.1990 ला पहिल्यांदा बालवाडी शिक्षिका म्हणून त्या सेवेत रूजू झाल्या होत्या. पुढे वर्ष 2000 मध्ये त्या अंगणवाडी सेविका झाल्या. त्यांना लहानपणापासूनच गाणी आणि कवितांचा छंद आहे. त्यांनी आतापर्यंत कामगार, स्त्री, बचतगट, शिक्षण, ऐक्य आणि जात्यावरची असंख्य गाणी लिहिली आहेत. त्याची एक झलक आजच्या आंदोलनस्थळी पाहायला मिळाली.
रेल्वे स्टेशनवरच्या राणू मंडलचा आवाज एका रात्रीत जगभर पोहोचला. अगदी त्याच जातकुळीतल्या आणि अनेक स्फूर्ती गीतांच्या जन्मदात्या या चंपाबाईंचं टॅलेंट समाज माध्यमातून साहित्य संमेलनाच्या व्यासपीठापर्यंत तरी पोहोचवता येईल का? ते पहावं लागेल.