महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

श्रीराम नवमी सणाला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा का नाही? प्रणिती शिंदेंची भाजपावर टीका - कुर्बान हुसेन

Congress MLA Praniti Shinde : लोकसभा डोळ्यासमोर ठेऊन भाजपाकडून राम मंदिराचं उद्घाटन केलं जात आहे असा आरोप काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केलाय. तसंच, आमदार पात्रतेचा जो निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिलाय तो चूक आहे असंही प्रणिती यावेळी म्हणाल्यात. त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

Congress MLA Praniti Shinde
प्रणिती शिंदे

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2024, 3:53 PM IST

सोलापूर Congress MLA Praniti Shinde : सोलापूरमध्ये (12 जानेवारी) हा दिवस बरात हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. (12 जानेवारी 1931)रोजी सोलापुरातील कुर्बान हुसेन, श्री किसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि मल्लप्पा धनशेट्टी यांना इंग्रजांनी फाशी दिली होती. या चार हुतात्म्यांना काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी अभिवादन केलं. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार पात्र-अपात्र यावर जो निर्णय दिलाय त्यावर शिंदे यांनी नाराजी व्यक्त केलीय. तसंच, नार्वेकर यांनी जो निकाल दिलाय तो आम्हाला अपेक्षितचं होता असं विधानही शिंदे यांनी यावेळी केलंय.

प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा रामनवमीला का केली नाही : 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा होणार आहे. एप्रिल महिन्यात राम नवमी आहे. त्यावेळी प्राण प्रतिष्ठा झाली असती, तर उत्तम झालं असतं. मात्र, भाजपवाले लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राम मंदिर प्राणप्रतिष्ठा करत असल्याचा थेट आरोप प्रणिती शिंदे यांनी केलाय. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर आहेत. निवडणुका तोंडावर आल्याने यांचे दौरे वाढतात. परंतु, लोकांना ज्यावेळी गरज असते, त्यावेळी त्यांचे दौरे वाढत नाहीत अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

राहुल नार्वेकरांसह मोदींवर टीका :चार हुतात्म्यांच्या स्मृती दिनानिमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी अभिवादन केलं. त्यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर भाष्य केलं. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूकपूर्व महाराष्ट्र दौऱ्यावर टीका केली. सोलापुरातील चारही हुतात्मे हे वेगवेगळ्या जातीधर्मातून जरी येत असले, तरी आपल्या मातीसाठी त्यांनी बलिदान दिलं. चार हुतात्म्यांचं प्रतीक हे देशासाठी आज महत्वाचं आहे. या मातृभूमीनं कधीही भेदभाव केला नाही. ज्यांनी मातृभूमीसाठी रक्त वाहिले, त्यांच्या रक्ताची कधी जात-पात-जमात नव्हती असंही त्या म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details