महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

KCR in Pandharpur: केसीआर यांचा शेकडो गाड्यांचा ताफा विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना - विठ्ठल दर्शन

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव व त्यांचे मंत्रिमंडळ सोलापुरात एक दिवस मुक्काम करून विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. सोलापुरातील विविध हॉटेलमध्ये बीआरएस नेत्यांनी मुक्काम केला होता. बीआरएस पक्षाच्या विस्तारासाठी केसीआर हे महाराष्ट्रात आले आहेत. सोलापुरातील काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनासाठी रवाना झाले आहेत.

KCR in Pandharpur
केसीआर पंढरपूरकडे रवाना

By

Published : Jun 27, 2023, 10:47 AM IST

केसीआर पंढरपूरकडे रवाना

सोलापूर :तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे विठ्ठल भक्त आहेत, म्हणूनच त्यांनी आषाढी एकादशीचा मुहूर्त म्हणून सोलापूर दौरा ठेवला होता. सोलापूर शहरातील बालाजी सरोवर या हॉटेलाला राजकीय छावणीचे स्वरूप आले होते. सोमवारी दिवसभर पोलिसांचा मोठा फौजफाटा बालाजी सरोवर या हॉटेलमध्ये तैनात होता. जवळपास 600 वाहने सोलापुरात दाखल झाल्याने सोलापूरकरांत एकच चर्चा होती. आज सकाळी 600 गाड्यांचा ताफा पंढरपूरकडे रवाना झाला आहे.

भगीरथ भालके यांचा बीआरएस प्रवेश :पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी नेते भगीरथ भालके हे मंगळवारी बीआरएस पक्षात प्रवेश करणार आहेत. पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावात पक्ष प्रवेशाचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भगीरथ भालके हे स्वर्गीय भारत नाना भालके यांचे चिरंजीव आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील राष्ट्रवादीचा मोठा नेता, बीआरएस पक्षात प्रवेश करत असल्याने सोलापुरातील वातावरण ढवळून निघाले आहे.

शरद पवारांना धक्का :भगीरथ भालके यांच्या प्रवेशाने शरद पवारांना मोठा झटका लागला आहे. भारत नाना भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून अभिजित पाटील यांच्या उमेदवारीला मूक संमती दिल्याने भगीरथ भालके राष्ट्रवादीवर नाराज झाले होते. सोलापूर शहरातील तेलगू भाषिक समाज देखील बीआरएस पक्षाकडे आकर्षित होत आहेत. शहरातील काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादुल, भाजपचे माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांची देखील भेट केसीआर यांनी घेतली.

शहरात झेंडे आणि बॅनरबाजी :सोलापूर शहरातील संतोष पवार या शेतकरी नेत्याने शहरात विविध ठिकाणी बॅनरबाजी व झेंडे लावून के चंद्रशेखर राव यांचा स्वागत केले होते. महाराष्ट्र राज्याच्या बाजूला असलेल्या तेलंगणा राज्याने शेतकऱ्यांसाठी विकासात्मक कामे केली. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी मात्र आजही हलाखीचे जीवन जगत आहेत, म्हणून आम्ही बीआरएस पक्षाचा प्रचार करणार असल्याची माहिती संतोष पवार यांनी दिली.

हेही वाचा :

  1. KCR in Solapur : मुख्यमंत्री केसीआर यांची सोलापुरात रॉयल एन्ट्री; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
  2. Sugar Factory Politics : साखरपट्ट्यात केसीआर यांची एन्ट्री; काँग्रेस, राष्ट्रवादीला धक्का देणार?
  3. KCR in Solapur : वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्यासाठी केसीआर यांना परवानगी नाही, केसीआर यांची जिल्हा प्रशासनावर नाराजी

ABOUT THE AUTHOR

...view details