सोलापूर- शहरासह आता ग्रामीण भागातही कोरोनाबाधित रुग्ण अढळत आहेत. त्यामुळे सावधानतेचा उपाय म्हणून करमाळ्यात दिनांक 27 ते 29 तारखेपर्यंत तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन समितीने घेतला.
कोरोनाशी लढा; संसर्ग रोखण्यासाठी करमाळ्यात तीन दिवसाचा जनता कर्फ्यू - ग्रीन झोन
शहरापुरते मर्यादित असलेले कोरोनाचे लोन आता ग्रामीण भागातही पोहोचत असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर करमाळ्यात सुरक्षिततेचा भाग म्हणून तहसीलदार समीर माने यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन समितीने तीन दिवयाचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला.
ग्रीन झोनमध्ये असलेला सोलापूर जिल्हा अल्पावधीतच रेड झोनमध्ये गेला आहे. मात्र सोलापूर शहरापुरते मर्यादित असलेले कोरोनाचे लोन आता ग्रामीण भागातही पोहोचत असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर करमाळ्यात सुरक्षिततेचा भाग म्हणून तहसीलदार समीर माने यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन समितीने तीन दिवयाचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला. 27 ते 29 एप्रिल या कालावधीत याची कडक अंबलबजावणी सुरू झाली. या दरम्यान वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून प्रतिसाद दिला आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासन नजर ठेवून आहे.