महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

KCR Visit Pandharpur : के.चंद्रशेखर राव येणार पंढरीच्या वारीला, विठुरायांच्या भेटीमागे काय आहे राजकीय गणित? - चंद्रशेखर पंढरपूर दौरा

केसीआर 26 ते 27 दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. 26 जूनला आल्यानंतर ते मोठे शक्तीप्रदर्शन करणार आहेत. महाराष्ट्रातील अनेक नेते आणि तेलंगणातून सोलापूरमध्ये हातमागच्या कामासाठी गेलेले कामगार केसीआरच्या भेटीला जाणार आहेत. केसीआर पंढरीपूर आणि तुळजापूर मंदिरात पूजा करणार आहेत.

केसीआर महाराष्ट्र दौऱ्यावर
केसीआर महाराष्ट्र दौऱ्यावर

By

Published : Jun 25, 2023, 10:00 AM IST

Updated : Jun 25, 2023, 11:20 AM IST

सोलापूर :शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेचा प्रश्नासह अनेक प्रश्न उपस्थित करत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव महाराष्ट्रातील राजकारणात उतरत आहेत. महाराष्ट्रात त्यासाठी ते पक्षाची बांधणी करत करू लागेल आहेत. याच पार्श्वभूमीवर 26 जूनला के. चंद्रशेखर राव महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. केसीआर 26 जूनला सोलापूरला आल्यानंतर 27 जूनला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेतील. या दिवसाच्या संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथे भालके यांचा बीआरएसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

असा असणार दौरा : बीआरएस प्रमुख आणि मुख्यमंत्री केसीआर उद्यापासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. पंढरीपूर आणि तुळजापूर मंदिरात पूजा केली जाणार आहे. केसीआर उद्या सकाळी 10 वाजता हैदराबाद सोडतील. केसीआरने रस्त्याने पंढरपूर आणि तुळजापूरला जाणार आहेत. दरम्यान त्यांच्यासोबत अनेक मंत्री, आमदार, आमदार, इतर लोकप्रतिनिधी आणि बीआरएस नेते मोठ्या ताफ्यात असतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 400 गाड्यांचा ताफा त्यांच्यासोबत असणार आहे. केसीआर आपल्या ताफ्यासह उद्या संध्याकाळी सोलापूरला पोहचणार असून रात्री तिथेच मुक्काम करतील. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेते भगीरथ बलके यांच्यासह अनेक नेते सीएम केसीआर यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये सामील होणार आहेत.

विठ्ठल भक्ती करणार : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील अनेक नेते आणि तेलंगणातून सोलापूरमध्ये हातमागच्या कामासाठी गेलेले कामगार केसीआरच्या भेटीला जाणार आहेत. मंगळवारी सकाळी ते सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे पोहोचतील आणि तेथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेणार आहेत. मंदिरात पूजा केल्यानंतर ते धाराशिव जिल्ह्यातील शक्तीपीठ असलेल्या तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतील, तेथेही ते विशेष पूजा करतील. त्यानंतर ते महामार्गाने हैदराबादला रवाना होतील.

महाराष्ट्रात मोठ्या यशाची अपेक्षा :आगामी काळात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकानंतर लगेच विधानसभेची निवडणूक होणार आहे. याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकादेखील जाहीर होणार आहेत. हे सर्व गणित लक्षात घेत तेलगंणाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात प्रवेश करत आहेत. महारष्ट्रात प्रवेश केल्यानंतर ते आपला पक्ष राष्ट्रीय पातळीवर नेणार आहेत. महाराष्ट्रात एमआयएमला जशाप्रकारे विजय मिळाला त्यापेक्षा जास्त प्रमाणात बीआरएसला यश मिळण्यासाठी केसीआर तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात पक्षाचे मोठा प्रवेश करण्यासाठी त्यांनी तयारी केली आहे. याच पार्श्वभूमीवर केसीआर 26 ते 27 दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. 26 जूनला आल्यानंतर ते मोठे शक्तीप्रदर्शन करणार आहेत. यासाठी तब्बल 400 गाड्यांच्या ताफ्यासह तेलंगणातील संपूर्णं मंत्रीमंडळ महाराष्ट्रात आणणार असल्याची चर्चा आहे. दुसऱ्या दिवशी 27 जूनला राष्ट्रवादीचे नेते भालके हे बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत.

राज्यातील राजकीय स्थितीचा फायदा : महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. भाजप आणि शिवसेनेची तुटली आहे. त्यात महाविकास आघाडी सरकारला पाडून शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील कलह, काँग्रेस पक्षाची हरवले ताकद, यासर्व गोष्टी लक्षात घेता के. चंद्रशेखर राव राज्यातील जनेतासाठी आधार बनू शकतात. राज्यातील जनता राजकराणापासून दूर जाताना दिसत आहेत. यामुळे के. चंद्रशेखर राव याचा फायदा होण्याची शक्यता आहे. बीआरएस पक्षाने लाखो वारकऱ्यांचा सहभाग असलेल्या वारीच्या मार्गात दिवेघाटातही बॅनर लावले आहे. बीआरएसचा ग्रामीण मतदारावर डोळा असल्याची राजकीय पक्षांमध्ये चर्चा आहे. ग्रामीण मतदारांना आकर्षित करण्यासाठी पंढरपूर दर्शनाची डिप्लोमसी केली जात असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा -

  1. Solapur News: केसीआर यांना सोलापुरी 'शिक कबाब' खाऊ घालू, सुशीलकुमार शिंदे यांचे वक्तव्य
  2. Devendra Fadnavis on KCR : केसीआर येणार विठ्ठलाच्या दर्शनाला; फडणवीस म्हणाले, भक्तीभावाने या, पण...
Last Updated : Jun 25, 2023, 11:20 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details