सोलापूर :सोलापुरातील बीआरएस नेत्यांच्या भेटीगाठी झाल्याने सोलापुरातील राजकिय वातावरण ढवळून निघाले आहे. बीआरएसच्या जोरदार इन्ट्रीने सोलापुरातील राजकीय वातावरणात गुलाबी रंग आला होता. शहरात विविध ठिकाणी गुलाबी झेंडे लावल्याने पिंक सिटी म्हणून सोलापूरची ओळख निर्माण झाली होती. भारत राष्ट्र समिती पक्षाने सोलापुरातील राजकिय वातावरणात हस्तक्षेप केल्याने भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. बीआरएसच्या इन्ट्रीने सोलापुरातील आगामी विधानसभा व महानगरपालिका निवडणुकीत राजकिय समीकरणे बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादीचा मोठा नेता बीआरएसच्या गळाला लागला आहे. भविष्यात पंढरपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी, भाजप आणि बीआरएस अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
तेलंगणाच्या मंत्रिमंडळात पाहुणे :सोलापुरातील माजी खासदार स्वर्गीय लिंगराज वल्याळ यांचे पुत्र, भारतीय जनता पार्टीतील माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या निवासस्थानी बीआरएस पक्षाच्या नेत्यांनी सोमवरी रात्री भेट दिली. तेलंगणा राज्य सरकारमधील अर्थमंत्री हरीश राव व अन्य मंत्री भेट घेतले. यांच्यासोबत औपचारिक भेट झाली आहे. पक्ष प्रवेशाबाबत मी काही बोलणार नाही. तेलंगणाच्या मंत्रिमंडळात आमचे पाहुणे आहेत. मी भाजप सोडून कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचा दुजोरा नागेश वल्याळ यांनी दिला आहे.
बंद खोलीत बीआरएस नेत्यांची चर्चा :भाजपचे माजी नगरसेवक नागेश वल्याळ सह तेलंगाणा राज्य सरकारमधील तिन्ही मंत्र्यांनी जवळपास अर्धा तास बंद खोलीत चर्चा केली. चर्चा कोणत्या विषयावर झाली याबाबत काहीही माहिती बाहेर आली नाही. बीआरएस पक्षाच्या इन्ट्रीने सोलापुरातील अनेक कार्यकर्त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केले. पूर्व विभागातील मतदार हे तेलगू भाषिक आहेत. आगामी निवडणुकीचे लक्ष डोळ्यासमोर ठेवून सोलापूरात बीआरएस पक्षाने मोर्चे बांधणीस सुरुवात केली आहे. तेलगू भाषिक वर्गाला बीआरएस जवळ करत आहे.
धर्मण्णा सादुल व केसीआर यांची भेट :तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी सोलापुरातील काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादुल यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. बीआरएस पक्ष वाढीसाठी सोलापूरची जबाबदारी धर्मण्णा सादुल यांकडे देण्यात आली आहे. काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादुल हे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जात होते. बीआरएसने वेगवेगळ्या राज्यात पक्ष विस्तार करत सर्वच पक्षातील नेत्यांना आमंत्रण दिले आहे.