माढा (सोलापूर) :माढ्यातील सह्याद्री परिवाराच्या वतीने आईसाहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या रुपात महालक्ष्मी (गौरी) उभारणी केली आहे. गेल्या १८ वर्षांपासून हा परिवार पुस्तकरूपी आरास उभी करुन पुस्तके वाचण्याचा संदेश देत आहे. यंदाच्या वर्षी देखील या परिवाराने माॅसाहेब जिजाऊ ना सिंहासनावर तर सावित्रीबाई फुले यांना उभ्या स्वरुपात ठेवण्यात आल्या आहेत.
महिलांना पुस्तकं भेट
सह्याद्री परिवाराच्या शारदा शिंदे, धनश्री शिंदे यांनी विद्युत रोषणाई, फुलाची आरास यासह अन्य पारंपरिक गौरी सजावटीला पूर्णपणे बगल देत राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या रुपात गौरी उभ्या केल्या आहेत. हळदी कुंकवासाठी येणाऱ्या महिलांना शिंदे प्रबोधनाची पुस्तके भेट देत आहेत. विविध प्रबोधनात्मक पुस्तके व समाजातील विविध ज्वलंत समस्यांविषयी सकारात्मक संदेश देऊन गौरी सजावट करण्याचा उपक्रम मागील १८ वर्षापासून राबवला जात आहे.
वाचन चळवळीला प्रोत्साहन देण्याचा उद्देश