महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...म्हणून जयंत पाटलांनी मास्क काढला - सोलापूर लेटेस्ट न्यूज

महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचार सभेत बोलताना जयंत पाटील म्हणाले, उपस्थित कार्यकर्त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून कोरोना जगात नसल्याची खात्री पटत आहे. त्यामुळे मीही मास्क काढून बोलतो असे म्हणत, त्यांनी मास्क काढून भाषणाची सुरुवात केली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधीनी त्यांना या बाबत विचारले असता उपस्थित कार्यकर्त्यांना उपरोधात हे बोललो असे त्यांनी सांगितले.

जयंत पाटील
जयंत पाटील

By

Published : Apr 4, 2021, 8:07 PM IST

पंढरपूर (सोलापूर) -पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराचा शुभारंभ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. मात्र, प्रचार सभेत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना जयंत पाटील यांनी तोंडावरील मास्क काढून भाषण केले. यावेळी कार्यकर्त्यांच्या तोंडाला मास्क नव्हते. त्यामुळे जयंत पाटील म्हणाले, तुम्ही मास्क काढला आहे. मीही मास्क काढून भाषण करतो.

जयंत पाटील
त्या वक्तव्यावर पाटलांनी दिले उत्तर
महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचार सभेत बोलताना जयंत पाटील म्हणाले, उपस्थित कार्यकर्त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून कोरोना जगात नसल्याची खात्री पटत आहे. त्यामुळे मीही मास्क काढून बोलतो असे म्हणत, त्यांनी मास्क काढून भाषणाची सुरुवात केली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधीनी त्यांना या बाबत विचारले असता उपस्थित कार्यकर्त्यांना उपरोधात हे बोललो असे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी कोरोना नसल्यासारखे कार्यकर्ते तोंडावर मास्क वापरला नाही. त्यासाठी असे करावे लागल्याचे उत्तर जयंत पाटील यांनी दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details