मंगळवेढा (सोलापूर) - मंगळवेढा शहर व तालुक्यात कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी 7 सप्टेंबर ते 22 सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू लावण्यात येणार आहे. हा जनता कर्फ्यू 15 दिवसाचा असणार आहे. शहरात सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू राहील. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा मंगळवेढा नगरपालिका प्रशासनाने दिला आहे.
मंगळवेढा शहर व तालुक्यात उद्यापासून जनता कर्फ्यू - solapur corona update news
जनता कर्फ्यूसाठी रविवारी नगरपालिकेचे पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते आणि व्यापारी संघटना यांची बैठक घेण्यात आली. कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी 7 सप्टेंबर ते 22 सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू लावण्यात मंगळवेढा शहरात लावण्यात येणार आहे.
मंगळवेढा शहरामध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आरोग्य यंत्रणा आणि नगरपालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी करून शहरातील संसर्ग रोखण्यात यश मिळवत आहे. मंगळवेढा शहरासह तालुक्यातील रुग्णांची संख्या 600 उंबरठ्यावर पोहोचली आहे. यातील तीनशेहून अधिक रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर 13 रुग्णांचा करोनामुळे बळी गेला आहे.
जनता कर्फ्यूसाठी रविवारी नगरपालिकेचे पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते आणि व्यापारी संघटना यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पुन्हा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार उद्यापासून सोमवारी जनता कर्फ्यूला सुरुवात होणार आहे. शहर व तालुक्यातील अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. केवळ रुग्णालये, मेडिकल, दूध विक्री आणि बँकांचेच कामकाज सुरू राहणार आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन नगरपालिका प्रशासनाने केले आहे. सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याचा इशारादेखील नगरपालिका प्रशासनाने दिला आहे.