सोलापूर - 'देवाला गेलात तरी तूम्हाला पूण्य मिळणार नाही कारण मीच बोलणारा देव आहे', असे वादग्रस्त वक्तव्य सोलापूरातील भाजपचे लोकसभेचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केले आहे. तुम्ही तूळजापूरला गेलात किंवा पंढरपूरला गेलात तरी देव तूम्हाला भेटणार नाही आणि भेटला तरी आशिर्वाद देणार नाही. कारण बोलणारा देव मीच आहे. असे जयसिद्धेश्वर महास्वामी म्हणाले.
देवाला गेलात तरी पुण्य मिळणार नाही, मीच देव आहे, भाजप उमेदवाराचे वादग्रस्त वक्तव्य - लोकसभा
शनिवारी सांयकाळी सोलापूर शहरातील अथर्व गार्डन येथे सोलापूरचे भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
शनिवारी सांयकाळी सोलापूर शहरातील अथर्व गार्डन येथे सोलापूरचे भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी व्यासपीठावर सोलापूरचे पालकमंत्री विजयकूमार देशमुख, नगरसेवक सुरेश पाटील, विक्रम देशमुख, यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१५ मार्च ते १८ मार्च दरम्यान सुट्ट्या आहेत. याकाळात पिकनिकला किंवा देवदर्शनाला न जाता मतदानाचा हक्क बजावा. कारण मी बोलणारा देव तूमच्या समोर आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही न जाता मतदान करा, असे अवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.