सोलापूर - राज्यात होत असलेल्या घडामोडीबाबत नरेंद्र पाटील म्हणाले की, राज्यात पुन्हा पहाटेचा शपथविधी होईल की दुपारचा होईल हे सांगता येत नाही. सोलापुरातील एका खासगी कार्यक्रमात आल्यावर अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी माध्यमांसमोर बोलताना आपले मत व्यक्त केले.
पुन्हा साहेब मुख्यमंत्री होतील -
चांगला नेता सत्तेवर यावा म्हणून उदयनराजे सोबत झालेल्या भेटीमध्ये सहज चर्चा केली आणि साहेब पुन्हा मुख्यमंत्री होतील असे नरेंद्र पाटील उदयनराजे यांना म्हणाले होते. मागील सरकारमध्ये ज्या-ज्या लोकांना महत्व होते, महाविकास आघाडीने त्या लोकांना बाजूला करण्याचे आघाडी सरकारने एक कलमी कार्यक्रम सुरू केला आहे. उद्धव ठाकरे यांनी अण्णासाहेब विकास महामंडळ बरखास्त केले आहे. उद्धव ठाकरेंमुळे मला अण्णासाहेब विकास महामंडळ अध्यक्ष पदावरून पायउतार व्हावं लागले, असे नरेंद्र पाटील बोलताना म्हणाले.
नरेंद्र पाटील पत्रकारांना माहिती देताना हे ही वाचा - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह
शेवटी मी शिवसेना पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असेही पाटील यांनी सांगितले. आता यापुढे देवेंद्र फडणवीस यासोबत पूर्ण वेळ काम करणार असल्याचे नरेंद्र पाटील यांनी जाहीर केले आहे.
मराठा समाजातील एक लाख तरुणांना उद्योजक घडविणार -
मराठा समाजातील तरुणांना घडविणार आणि उद्योगासाठी प्रोत्साहन देणार तसेच मराठा समाजातील तरुणांना उद्योग उभारणीसाठी कोणत्याही स्वरूपाची अडचण येऊ देणार नाही. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचा स्वप्न पूर्ण करणार असल्याची माहिती नरेंद्र पाटील यांनी सांगितली. राज्यातील एक लाख मराठा तरुणांना उद्योजक बनविणार असल्याची माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली.
अशोक चव्हाणांना मराठा आरक्षणाबाबत काडीइतकेही माहिती नाही -
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. पण ज्यावेळी याची सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली. त्यावेळी 102 वी घटनादुरुस्तीबाबत चर्चा झाली आणि देशाचे महाधिवक्ता यांनी आरक्षणाबाबतीत राज्यावर निर्णय सोडला होता. पण हे प्रकरण अशोक चव्हाण यांच्याकडे देण्यात आले. याउलट आम्ही हे प्रकरण एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्याची मागणी केली होती. कारण अशोक चव्हाण यांना याबाबत काडीइतकेही ज्ञान नाही, अशी टीका देखील नरेंद्र पाटील यांनी यावेळी केली.